Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PF Withdrawal: उमंग अ‍ॅपवरून कसे काढायचे पीएफचे पैसे? जाणून घ्या

Umang App

UMANG App चा वापर करून तुम्हाला अगदी सहजपणे ईपीएफओ (EPFO) संबंधित माहिती जाणून घेता येते. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट करणे, तसेच तुम्हाला पीएफमधील रक्कम देखील काढण्यासाठी या अॅपवरून अर्ज दाखल करता येतो.

ईपीएफ म्हणजे कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी ही एक निवृत्ती लाभ योजना म्हणून ओळखली जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा एक बचतीचा सर्वोत्कृष्ट बचत प्लॅटफॉर्म देखील मानला जातो. मात्र, काहीवेळा आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आपणास निधीची आवश्यकता भासते त्यावेळी आपण या भविष्यनिर्वाह निधीचा वापर करू शकतो. हा निधी आपणास उमंग(UMANG) अॅपच्या माध्यमातून देखील ऑनलाइन पद्धतीने काढता येतो. आज आपण उमंग अ‍ॅपच्या (Unified Mobile Application for New-age Governance) माध्यमातून कशा प्रकारे पीएफ काढता येऊ शकतो याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

UMANG अॅप हे नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) यांनी भारतात मोबाईल गव्हर्नन्स चालविण्याच्या उद्देशाने विकसित केले आहे. हे मोबाइल अॅप नागरिकांना केवळ एकाच प्लॅटफॉर्वर केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारी सेवांची माहिती मिळावी आणि त्याचा वापर करता यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामाध्यमातून वापरकर्त्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, पीएफ, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यासह अनेक सरकारी योजना आणि सुविधांचा फायदा घेता येतो.

घरबसल्या काढता येतो पीएफ - PF Withdrawal

ईपीएफच्या सदस्यांना UMANG APP च्या माध्यमातून आपल्या भविष्य निर्वाह निधीतील काही रक्कम काढता येणे सहज शक्य आहे. यासाठी ऑनलाईन अॅप्लिकेशन करणे  गरजेचे आहे. ईपीएफओच्या सदस्यांना उमंग अॅप वापरून आपल्या पीएफ खात्याचा सर्व तपशील जाणून घेता येतो. तुमच्या खात्यात किती निधी शिल्लक आहे. तुम्ही यापूर्वी किती निधी काढला आहे. किती जमा झाला आहे याची माहिती आपणास सहज उपल्बध होते. दरम्यान, UMANG अॅपवर EPFO ची सेवा मिळवण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर UAN आणि OTP वापरून लॉगिन करावे लागेल.

UMANG APP लॉगिन कसे कराल?

  • प्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल अॅप स्टोअर वरून उमंग अॅप डाउनलोड करा.
  • अॅप उघडा, त्यानंतर तुमचा केवायसी केलेला आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड टाकून साइन इन करा.
  • तुम्ही विविध पद्धती वापरून उमंग अॅपवर लॉग इन करू शकता
  • उमंग अॅप आणि एम-पिनसह नोंदणीकृत मोबाइल क्रमांक
  • उमंग अॅप आणि ओटीपीसह नोंदणीकृत मोबाइल क्रमांक
  • तुम्ही तुमचे Facebook, Google+ किंवा Twitter वापरून लॉग-इन करू शकता.

UMANG APP च्या साह्याने पीएफमधील पैसे कसे काढायचे? 

  • उमंग अॅपवर लॉगिन केल्यानंतर,सेवांच्या सूचीमध्ये EPFO ​​सेवा निवडा.
  • त्यानंतर तुमचा UAN (यूनिवर्सल अकाउंट नंबर)टाका 
  • तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर प्राप्त झालेल्या OTP टाका
  • लॉगिन झाल्यानंतर तुमच्या गरजेनुसार खालील पैकी पर्याय निवडा
  • कर्मचारी केंद्रित सेवा, सामान्य सेवा, नियोक्ता केंद्रित सेवा, पेन्शनर सेवा 
  • त्यानंतर तुम्ही “Raise Claim” या पर्यावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचा EPF UAN नंबर टाका त्यानंतर नंबरवर आलेला OTP सबमिट करा.
  • पुढे Withdrawal च्या प्रकारची निवड करा आणि आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करा
  • तुम्हाला Claim रेफरन्स नंबर मिळेल. या नंबरचा वापर करून तुम्ही क्लेम स्टेटस बघू शकाल.
  • EPFO कडून पुढील 4ते 5 दिवसात तुमच्या खात्यात तुमचे पैसे जमा केले जातील.