बिझनेसची अशी आयडिया आम्ही सांगत आहोत, ज्यामुळे दर महिन्याला तुम्ही लाखोंची कमाई (Earning) कराल. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे अॅलोव्हेरा ज्यूस (Aloevera Juice) म्हणजेच कोरफडीचा रस बनवण्याच्या युनिटचा व्यवसाय. कोरफडीचा वापर प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जातो. त्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजं (Vitamins and minerals) असतात. त्यासोबतच त्यात अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्मदेखील असतात. कोरफडीची मागणी सातत्यानं वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेता कोरफडीचा रस बनवण्याचा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, यात शंकाच नाही. झी बिझनेसनं याचा आढावा घेतला आहे.
गुंतवणूक कशी?
व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुंतवणूक. तुम्हाला तुमच्या खिशातून या व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं (KVIC) अॅलोव्हेरा ज्यूस व्यवसायाच्या प्रकल्प खर्चाला 26.56 लाख रुपये मंजूर केले आहेत. तुम्हाला फक्त 2.66 लाख रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित रक्कम वित्तपुरवठा करून मिळवता येवू शकेल. तुम्हाला 18.90 लाख मुदतीचं कर्ज आणि खेळत्या भांडवलासाठी 5 लाखांचा वित्तपुरवठा होईल.
नोंदणी गरजेची
कोणताही मोठा व्यवसाय उभा करण्यासाठी त्याची नोंदणी गरजेची असते. या व्यवसायासाठीदेखील तुम्हाला विविध नोंदणी गरजेची ठरणार आहे. यासाठी, जीएसटी नोंदणी, उद्योग आधार नोंदणी, उत्पादनाचं ब्रँड नाव गरजेचं असेल.
किती नफा?
या व्यवसायातून तुम्ही वार्षिक 13 लाख रुपयांहून अधिकची कमाई करू शकता. पहिल्या वर्षी सरासरी 3.03 लाख रुपयांचा नफा होईल. दुसऱ्या वर्षी 4.15 लाख आणि तिसऱ्या वर्षी 7.76 लाख. तर यानंतर हा नफा झपाट्यानं वाढणारदेखील आहे. पाचव्या वर्षी तुमचा नफा सुमारे 13.88 लाख रुपयांपर्यंत जाईल.