Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hurun India Report: भारतातील 'या' गुंतवणूकदारांच्या कंपन्या बनू शकतात युनिकॉर्न; यापैकी एक आहे शार्क टॅंक इंडियाचा जज

Hurun India Report

Hurun India Report: एएसके प्रायव्हेट वेल्थ हुरून इंडियाने 147 स्टार्टअप कंपन्यांवर आधारित एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामधील काही स्टार्टअप भविष्यात युनिकॉर्न बनणार आहेत. या युनिकॉर्न कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या टॉप 5 गुंतवणूकदारांबद्दल माहिती करून घेऊयात. यापैकी एक गुंतवणूकदार हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा असून तो शार्क टॅंक इंडियाचा जज आहे.

एएसके प्रायव्हेट वेल्थ हुरून इंडियाने (ASK Private Wealth Hurun India) देशातील स्टार्टअप कंपन्यांवर आधारित एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार या स्टार्टअप उद्योगांपैकी काही कंपन्या येत्या काळात युनिकॉर्न बिजनेस बनणार आहेत. या अहवालात 147 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी काही कंपन्या पुढील 5 वर्षात युनिकॉर्न बनू शकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या कंपनीचे मूल्य 1 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे, त्यांना युनिकॉर्न असे म्हटले जाते. या स्टार्टअप व्यवसायात देशातील टॉप 5 गुंतवणूकदारांचा समावेश आहे. या टॉप 5 गुंतवणूकदारांमध्ये शार्क टॅंक इंडियाच्या एका जजचा (Shark Tank India Judge) देखील समावेश आहे.

कुणाल बहल (Kunal Bahl)

कुणाल बहल हे स्नॅपडीलचे संस्थापक आहेत. व्हार्टन अँड केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांनी अल्पकाळ काम केले. 2007 मध्ये व्हिसाच्या समस्येमुळे त्यांना भारतात परत यावे लागले. त्यानंतर तीन वर्षांत त्यांनी स्नॅपडीलची स्थापना केली, जिथे त्यांना बऱ्याच चढ- उतरांना सामोरे जावे लागले. हुरूनच्या अहवालानुसार, त्यांनी 200 स्टार्टअप उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यापैकी 8 कंपन्या युनिकॉर्न बनतील असे सांगण्यात आले आहे.

रोहित बंसल (Rohit Bansal)

रोहित बंसल दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये कुणाल बहल सोबत शिकत  होते. दोघेही शाळेपासूनचे मित्र आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून पदवी प्राप्त केली आहे. रोहित बंसल हे देखील स्नॅपडीलचे सह- संस्थापक आहेत. त्यांच्या मित्राप्रमाणेच त्यांनीही नाविन्यपूर्ण आणि भिन्न कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी ओला या युनिकॉर्न कंपनीतही गुंतवणूक केली आहे. हुरुनच्या अहवालानुसार, त्यांनी आठ युनिकॉर्न कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. कुणाल बहल प्रमाणे यांनी केलेली गुंतवणूक ही एकसमान आहे.

आनंद चंद्रशेखरन (Anand Chandrasekaran)

आनंद चंद्रशेखरन यांनी पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर येथून पदवी प्राप्त केली असून स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी एअरटेल आणि स्नॅपडीलमध्येही काम केले आहे. स्नॅपडीलमध्ये ते मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी Yahoo मध्ये देखील काम केले होते. 2015 मध्ये त्यांनी Snapdeal मधून राजीनामा दिला. सध्या ते PE Firm General Catalyst च्या गुंतवणुकीमधील भागीदार आहेत.त्यांची ओळख ही त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयमुळेच आहे. त्यांनी भारतातील 16 स्टार्टअप उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे. या सर्व कंपन्या हुरूनच्या रिपोर्टनुसार युनिकॉर्न बनतील असा अंदाज वर्तवला जात आहे. 

कुणाल शाह (Kunal Shah)

कुणाल शाह यांना 'क्रेड' या युनिकॉर्न कंपनीचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. त्यांनी 12 स्टार्टअप्समध्ये आत्तापर्यंत गुंतवणूक केली असून जी हुरूनच्या संभाव्य युनिकॉर्नच्या यादीचा सहभागी आहेत. कुणाल शाह हे मुंबईतील विल्सन कॉलेजचे पदवीधर असून त्यांनी फिनटेक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. कुणाल यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात पैसाबॅक ( Paisaback) पासून केली होती. पुढे जाऊन या कंपनीला Ibibo ने खरेदी केले होते.

अनुपम मित्तल (Anupam Mittal)

शार्क टॅंक इंडियाचे जज अनुपम मित्तल देखील यामध्ये समाविष्ट आहेत. अनुपम हे shaadi. com चे संस्थापक आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यापूर्वी त्यांनी Ola कंपनीत गुंतवणूक केली होती. हुरूनच्या अहवालानुसार अनुपम यांनी 6 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ज्या कंपन्या पुढे जाऊन युनिकॉर्न बनतील.

Source: hindi.moneycontrol.com