Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

8th Pay Commission : आठवा वेतन आयाेग स्थापन होणार का?; केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

मागील सलग तीन वेतन आयोगात जर महागाई भत्ता 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाला तर वेतनाची फेररचना करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकार आठवा वेतन आयोग लागू करणार का? असा प्रश्न राज्यसभा सदस्य रामनाथ ठाकूर यांनी विचारला होता.

Read More

Business Idea: वर्षातील काही महिने बंपर कमाई करुन इतर दिवस एन्जॉय करायचेत! टेंट हाऊस बिझनेसचा पर्याय ठरेल फायदेशीर

Business Idea:आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कार्यक्रम कुठलाही असो तो मंडप टाकल्या शिवाय अपूर्णच असतो. अगदी गावखेड्यापासून ते शहरातील चौकांमध्ये सुध्दा सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी आणि विवाहसोहळ्यात वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या टेंट हाऊसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच या व्यवसायातून होणारा नफा देखील वाढत आहे.

Read More

Insurance For Govinda : दही हंडी उत्सवासाठी 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण; सरकार करणार खर्च

दहिहंडी या उत्सवप्रिय खेळामध्ये गोविंदा पथकातील गोविंदाना दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. त्यातच राज्य सरकारच्या वतीने यंदा प्रो गोविंदा (PRO Govinda 2023) स्पर्धचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल 50000 गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमा संरक्षण एक महिन्या करिता वैध राहणार आहे.

Read More

Wild animal attack : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील पीडितास 30 दिवसात नुकसान भरपाई; दिरंगाई झाल्यास व्याजही मिळणार

वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई पीडितास 30 दिवसाच्या आत मिळेल. तसेच ही भरपाई मिळण्यास दिरंगाई झाल्यास पीडितास त्या रकमेवर व्याज देण्यात येणार आहे.

Read More

Pune Metro : सवलतींची खैरात; पुणे मेट्रोकडून शनिवार, रविवारी तिकीट दरात 30 % सूट, विद्यार्थ्यांनाही ऑफर

पुणे मेट्रोच्या विस्तारित टप्प्याचे 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये फुगेवाडी मेट्रोस्टेशन ते सिव्हील कोर्ट या एकूण 6.9 किमीच्या मेट्रो मार्गावर दापोडी, बोपोडी, शिवाजी नगर आणि सिव्हिल कोर्ट या 4 स्थानकांचा समावेश आहे. तर गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल या 4.7 किमीच्या अंतरात तब्बल 7 स्थानकांचा समावेश आहे.

Read More

Rules Changes From August: ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या 'या' बदलांमुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार

Rules Changes From August: नोकरी करणाऱ्या नागरिकांचे प्रत्येक महिन्यातील खर्चाचे एक बजेट ठरलेले असते. प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम तुमच्या हाती येत असल्याने, जराही खर्चाचा ताळमेळ इकडे तिकडे झाला की, त्याचा प्रभाव तुमच्या बचतीवर, महिन्याच्या खर्चावर आणि इतर सर्व गोष्टींवर जाणवू लागतो. अशाच प्रकारचे काही बदल येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात तुम्हाला जाणवणार आहेत.

Read More

Investment in india : अमेरिकेतील कंपनी भारतात करणार 1000 कोटींची गुंतवणूक; सिलिकॉन कार्बाइडचा प्लांट उभारणार

अमेरिकेतील सिलिकॉन पॉवर ग्रुपने देखील भारतातील ओडिशामध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीकडून ओडिशामध्ये सिलिकॉन कार्बाइड उत्पादनचा प्लांट (silicon carbide manufacturing) उभारण्यात येणार आहे.

Read More

Second Hand Car Buying: जुनी कार खरेदी करण्यापूर्वी 'या' 4 गोष्टी नक्की तपासून पाहा

Second Hand Car Buying: सध्या बरेचजण नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुनीच कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. याचा फायदा असा की, चांगल्या कंडीशनमधील कार कमी किंमतीत खरेदी करता येते. जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी 4 गोष्टी नक्की तपासून पाहा.

Read More

RVNL : केंद्र सरकार विकणार रेल्वे विकास निगमची 5.36% हिस्सेदारी

सरकारकडून रेल्वे विकास निगमच्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेल (OFS)पद्धतीने केली जाणार आहे. 27 आणि 28 जुलै रोजी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. रेल्वे विकास निगमकडून एकूण 7,08,90,683 इक्विटी शेअर्स ऑफरमध्ये विक्रीसाठी प्रस्तावित आहेत. तसेच कंपनीने अतिरिक्त 4,08,66,394 शेअर्स विकण्याचा पर्याय देखील उपलब्ध ठेवला आहे.

Read More

Ukraine Russia War : अमेरिका युक्रेनला करणार 400 अब्ज डॉलरची मदत; लष्करी साहित्य पाठवणार

अमेरिका युक्रेनला आणखी 400 अब्ज डॉलरची मदत करणार आहे. या निधीच्या माध्यमातून युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, तोफा, बुलेटप्रुफ लष्करी वाहने यासह इतर युद्ध साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे.

Read More

Irshalgad Landslide : इरशाळवाडी दुर्घटनेतील 41 बाधित कुटुंबांना आर्थिक मदत; प्रतिकुटुंब 1 लाख रुपये मिळणार

इराशळवाडी येथील नैसर्गिक आपत्तीनंतर एकूण 43 कुटुंबातील तब्बल 144 लोक बचावले आहेत. त्यांचे संसार पुन्हा उभे करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी मदत करण्यात येत आहे. तसेच या घटनेत 22 मुलं निराधार झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत इरशाळवाडीच्या नैसर्गिक आपत्ती बाधित आदिवासी कुटुंबांना 41 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.

Read More

Action on Privet Travels : नियमबाह्यपणे तिकीट आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक बसेसवर कारवाई; 1 कोटी 83 लाख दंड वसूल

संपूर्ण राज्यात 14 हजार 161 खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 4277 बसेस नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या आढळून आल्या आहेत. संबंधित बस चालक मालकांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत विविध गुन्ह्या अंतर्गत 1 कोटी 83 लाख दंड वसूल करण्यात आला आहे.

Read More