Rules Changing Hit Your Pocket: जर तुम्ही करीत असलेल्या गुंतवणूक योजनेमध्ये काही बदल झालेत, किंवा तुमच्या बँक प्रणालीमध्ये काही बदल झालेत, तसेच तुम्ही करीत असलेल्या दैनंदिन व्यवहाराच्या बाबतीत खर्च वाढला, तर या सर्व गोष्टींचा प्रभाव तुमच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर होते. ऑगस्ट महिन्यात देखील तुम्हाला अशा काही बदलांना समोर जावे लागणार आहे. जाणून घेऊयात काय असणार ते बदल.
Table of contents [Show]
SBI ची अमृत कलश योजना
SBI च्या अमृत कलश योजनेत सामान्य नागरिकांना 7.1 टक्के व्याजदर दिल्या जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याजदर दिल्या जात आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे. 400 दिवसांच्या टर्म डिपॉझिट योजनेत प्रीमॅच्युअर विड्रॉल आणि लोन ची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे.
क्रेडिट कार्ड
अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करुन फ्लिपकार्ट वरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणारे Incentive Points आणि Cashback ऑफर ऑगस्ट महिन्यापासून कमी करण्यात आले आहेत. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करुन फ्लिपकार्ट वरुन कुठलेही सामान खरेदी केल्यास तुम्हाला केवळ 1.5 % Cashback ऑफर मिळणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला सामान घेताना पूर्वीपेक्षा अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.
इंडियन बँक एफडी
इंडियन बँकेच्या वतीने ग्राहकांना ऑफर करण्यात आलेली IND SUPER 400 DAYS योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. यामध्ये तुम्ही 10 हजार रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. याअंतर्गत सामान्य ग्राहकांना 7.25 % व्याज दिले जाणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 % व्याज दिले जाणार आहे. तुम्हाला जर या योजनेत गुंतवणूक करायची असेल, ऑगस्ट महिना शेवटचा असल्याने, या महिन्यात तुमच्या खिशावर या योजनेचा भार पडू शकतो.
IDBI बँक एफडी योजना
अमृत महोत्सवी वर्षाअंतर्गत IDBI बँकेने 375 आणि 444 दिवसांची एफडी योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे. या योजनेत 375 दिवसांच्या एफडीवर 7.60 % व्याज आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.75 % सर्वाधिक व्याज दिल्या जात आहे. त्यामुळे तुम्ही वेळ जाण्यापूर्वी गुंतवणूक करण्याचा विचार करु शकता.
ITR डेडलाईन संपुष्टात येणार
जर तुम्ही 31 जुलै 2023पर्यंत आयटीआर फाईल केले नाही तर 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. हा दंड तुम्हाला 1 ऑगस्ट 2023 पासुन लागू होईल. आयकर कायदा 1961 च्या कलम 234F अंतर्गत ज्यांचे उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना 5,000 रुपये दंड भरावा लागेल. तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना 1000 रुपये दंड भरावा लागेल. सोबतच 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला आर्थिक वर्ष 2022-23 चे इन्कम टॅक्स भरण्याची मुदत दिली जाईल.
वेळेत करा काम पूर्ण
तसेच बँक संबंधित कुठलेही काम तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण ऑगस्ट महिन्यात बँकेला तब्बल 14 दिवसांच्या सुट्टया राहणार आहे. त्यामुळे तुमचे बँकेचे असे कुठलेही काम ज्यावर तुम्हाला दंड आकारण्यात येईल, ते काम तुम्ही लगेचच पूर्ण केले पाहिजेत.