Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: वर्षातील काही महिने बंपर कमाई करुन इतर दिवस एन्जॉय करायचेत! टेंट हाऊस बिझनेसचा पर्याय ठरेल फायदेशीर

Tent House Business

Image Source : www.marketplace.ezeinvite.com

Business Idea:आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कार्यक्रम कुठलाही असो तो मंडप टाकल्या शिवाय अपूर्णच असतो. अगदी गावखेड्यापासून ते शहरातील चौकांमध्ये सुध्दा सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी आणि विवाहसोहळ्यात वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या टेंट हाऊसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच या व्यवसायातून होणारा नफा देखील वाढत आहे.

Business Idea: असे अनेक व्यावसायिक असतात, ज्यांना व्यवसायात एकदा पैसे लावून अनेक वर्ष बंपर कमाई करायची असते. त्याचप्रमाणे असेही लोक असतात ज्यांना वर्षातील काही महिने बंपर कमाई करुन इतर दिवस मौज मज्जा करायची असते. जर तुम्ही सुध्दा अशाच प्रकारचा कुठला व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत आहात तर मग टेंट हाऊसचा व्यवसाय तुमच्याकरीता अगदी परफेक्ट आहे.

कुठेही सुरु कराल हा व्यवसाय

टेंट हाऊस (Tent House Business) चा व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे, जो तुम्ही कुठे पण सुरु करु शकता. अगदी गावखेडे, शहर, मोठी मेट्रो शहरे या सर्वच ठिकाणी या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे. या व्यवसायात कुठलेच नुकसान नाही, हे सर्व सामान ठेवायला तुम्हाला केवळ एका मोठ्या हॉलची आवश्यक्ता राहील. आजकाल कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला देखील टेंट हाऊस पाहिजे असतात.

अगदी कमी गुंतवणुकीतून होणार सुरु

टेंट हाऊसचा व्यवसाय हिवाळा आणि उन्हाळ्यात सगळ्यात जास्त नफा देतो. कारण आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नामध्ये प्रचंड मोठे आणि सजवलेले, आकर्षक असे टेंट हाऊस टाकून लग्न करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरु आहे. तसेच कुठल्याही लग्नाचा कार्यक्रम तीन ते चार दिवस असतोच. त्यामुळे तेवढे दिवसाचे भाडे तुम्हाला मिळत असते. हा व्यवसाय 1.5 लाख ते 5 लाख रुपयांमध्ये सुरु केला जाऊ शकतो. तर सिझन मध्ये प्रत्येक महिन्यात तुम्हाला 50 ते 80 हजार रुपये नफा मिळू शकतो.

तुम्हाला हा व्यवसाय आणखी मोठा करायचा असेल, तर तुम्ही ग्राहकाला टेंट हाऊस सोबतच डेकोरेशनचे इतरही सामान देऊ शकता. जसे की, खुर्च्या, मॅट, लाइट, पंखे, कुलर, म्यूजिक सिस्टम, आणि फूलांचे डेकोरेशन करुन देण्याचा ऑर्डर देखील तुम्ही स्वत:कडे घेऊ शकता. यामुळे तुमच्या व्यवसायात विविधता येईल आणि तुम्हाला आणखी चांगला नफा मिळेल.