Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Agricultural Servant Salary : राज्यातील कृषी सेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ; विधानसभेत घोषणा

राज्याच्या कृषी विभागाअंतर्गत काम करणारे कृषीसेवक केवळ 6000 रुपये प्रतिमहिना या अल्प मानधनावर आपली सेवा बजावत होते. दरम्यान, या कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला होता. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी सेवकांच्या मानधनात प्रति महिना 10000 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात विधानसभेत घोषणा करण्यात आली.

Read More

Pending FRP : 86 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 817 कोटींची ऊसबिले थकवली; साखर आयुक्तालयाकडून जप्तीचा इशारा

राज्यात गेल्या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये एकूण 211 साखर कारखाने (SUGAR FCATORY) सुरू होते. या कारखान्यांना ऊस घालणार्‍या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवलेला दर देणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यात फक्त 125 साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे. तर उर्वरीत 86 साखर कारखान्यांकडे कमी अधिक प्रमाणात एफआरपी थकीत आहे.

Read More

Business idea: स्मार्टफोनच्या जमान्यात 'हा' व्यवसाय देईल पैसाच पैसा!

Business idea: नोकऱ्यांची कमी होणारी संधी, अनेक ठिकाणी होणारी नोकरकपात आणि तरुणांवर कोसळणारी बेकारीची कुऱ्हाड या सर्व बाबींचा विचार करता व्यवसाय करण्याचं डोक्यात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कमी गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्या व्यवसायाविषयी थोडक्यात माहिती पाहू...

Read More

Mill Workers House : गिरणी कामगारांना घरासाठी ठाण्यात जमीन देण्याचा शासनाचा विचार; म्हाडा बांधणार घरे

सध्या मुंबईसह उपनगरामध्ये घरांसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून या गिरणी कामगारांना ठाणे जिल्ह्यात विनामूल्य जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.

Read More

Milk Rate Hike : कर्नाटक सरकारने दुधाचे दर 3 रुपयांनी वाढवले; सीमा भागातील शेतकऱ्यांना होणार फायदा

कर्नाटकमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील सरकारने 1 ऑगस्टपासून गाईच्या दुधाला प्रति लिटर 3 रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीनंतर कर्नाटकातील शेतकऱ्यांना आता गाईच्या दुधाला प्रतिलिटर 33 रुपये दर मिळणार आहे. कर्नाटकमधील सर्वच दुध संघांनी प्रतिलिटर 5 रुपयांनी दूध दर वाढ करण्याची मागणी केली होती.

Read More

Business Idea: रतनजोत ठरतेय वरदान! 'बायोडिझेल'मुळे शेतकऱ्यांना चांगल्या कमाईची संधी

Business Idea: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्यावर अनेक पर्याय शोधले जात आहेत. जसे की, ऊसामधून मिळत असलेल्या इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे डिझेलला पर्याय म्हणून बायोडिझेल देणाऱ्या वनस्पतींची लागवड शेतकरी करीत आहेत. यामध्ये रतनजोत या वनस्पतीचा समावेश आहे. यामधून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

Read More

Stipend for ITI students : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतन; सप्टेंबर पासून खात्यात येणार 500 रुपये

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना यापुढे महिन्याला 500 रुपये विद्यावेतन (Stipend for ITI students) दिले जाणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या खात्यात ते जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात दिली आहे.

Read More

Self Help Groups : महिला बचत गटांना आता मिळणार दुप्पट निधी; मार्गदर्शकांच्या मानधनातही वाढ

बचत गटांना राज्य शासनाकडूनही मदतीचा हातभार लावला जातो. बचत गटांना प्रोत्साहन देऊन आणखी बळकट करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे महिला स्वयं सहायता गटांना राज्य सरकारकडून दुपटीने अर्थ सहाय्य मिळणार आहे.

Read More

Expensive countries: 'हे' आहेत जगातले महागडे देश, भारत कोणत्या क्रमांकावर?

Expensive countries: महागाई वाढत आहे. त्याप्रमाणे राहण्याचा खर्चही वाढत आहे. भारतातली महागाई सर्वांनाच माहीत आहे आणि लोक अनुभवतही आहेत. अनेक गोष्टी आपल्याला महाग वाटतात. मात्र तरीदेखील भारतापेक्षा अनेक देश कितीतरी पटींनी महाग आहेत. पाहूया...

Read More

India Post Payments Bank: घरबसल्या पोस्टाचे डिजिटल सेव्हिंग अकाउंट सुरू करा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

India Post Payments Bank: तुम्हालाही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये ऑनलाईन डिजिटल सेव्हिंग अकाउंट सुरू करायचे असेल, तर ते तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून आयपीपीबी हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. हे अकाउंट ओपन करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ.

Read More

Ganesh Festival competition : राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा; 5 लाखांपर्यंतचे बक्षीस

यंदाच्या वर्षी 19 सप्टेंबर 2023 ला गणेशाचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाकडून तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यस्तरावर पहिल्या क्रमांकासाठी 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर तृतीय क्रमांकासाठी 2.5 आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

Read More

साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामात डिजिटल काटे अनिवार्य; काटामारी थांबल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपी (FRP) प्रमाणे प्रति टनास दर मिळतो. मात्र, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करताना काटा मारला जात असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून सर्व कारखान्यांचे काटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात येते. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून सकारात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत.

Read More