भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल विकास निगम (RVNL) या कंपनीचे शेअर्स विकण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. रेल्वेसंदर्भातील विविध प्रकल्पांची कामे रेल्वे विकास निगमकडून घेतली जातात. वंदे भारत रेल्वेची निर्मिती करणाचे कामही रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ही करत आहे. याच कंपनीतील 5.36% भागीदारी विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भात सार्वजनिक मालमत्ता विभागाकडून ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.
दोन दिवस होणार विक्री
सरकारकडून रेल्वे विकास निगमच्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेल (OFS)पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी 27 आणि 28 जुलै रोजी शेअर्सची विक्री सुरू होणार आहे. रेल्वे विकास निगमकडून एकूण 7,08,90,683 इक्विटी शेअर्स ऑफरमध्ये विक्रीसाठी प्रस्तावित आहेत. तसेच कंपनीने अतिरिक्त 4,08,66,394 शेअर्स विकण्याचा पर्याय देखील उपलब्ध ठेवला आहे.
1330 कोटी रुपयांची अपेक्षा-
RVNL चे एकूण 11.17 कोटी शेअर्चची विक्री करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रति शअर्स 119 रुपये या प्रमाणे सरकारी तिजोरीत 1329 कोटी रुपयांची भर पडेल, अशी अपेक्षा सरकारला आहे. 26 जुलैला कंपनीचे शेअर्स 134. 35 रुपयांवर बंद झाले होते. दरम्यान, या शेअर्स विक्रीच्या निर्णयाने सरकारी कंपन्यांमध्ये खासगी भांडवलादारांचा समावेश होणार आहे.