महाराष्ट्रात गणेश उत्सवाप्रमाणे कृष्ण जन्म अष्टमीचाही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गोपाळ काल्यादिवशी साजरा केला जाणारा दहीहंडी उत्साव दिवसेदिवस लोक प्रिय होत चालला आहे. राज्य सरकारच्या वतीने यंदा प्रो गोविंदा (PRO Govinda 2023) स्पर्धचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गोविंदा पथकांच्या सुरक्षेचीही खबारदारी घेतली असून गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साहसी खेळाचा दर्जा
यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबरला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. यासाठी गोविंदा पथकांकडून सर्वात जास्त थराची दहीहंडी उभी करण्यासाठी सरावाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरही तयारी सुरु करण्यात आली आहे. राज्य शासनाने यावर्षीही दही हंडी खेळास साहसी खेळाचा दर्जा दिला आहे.
50000 गोविंदांना विमा संरक्षण-
दहिहंडी या उत्सवप्रिय खेळामध्ये गोविंदा पथकातील गोविंदाना दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. त्यातच राज्य सरकारच्या वतीने यंदा प्रो गोविंदा (PRO Govinda 2023) स्पर्धचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल 50000 गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमा संरक्षण एक महिन्या करिता वैध राहणार आहे. या विम्याचा खर्च राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे.
राज्यात प्रथमच प्रो गोविंदा स्पर्धा- (PRO Govinda 2023)
दंही हंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात क्रीडा विभागाकडून प्रो कब्बड्डीच्या धरतीवर प्रो गोविंदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दहीहंडी समन्वय समितीची बैठक पार पडली आहे. त्या बैठकीत राज्यात प्रो गोविंदा (PRO Govinda 2023) स्पर्धा आयोजित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. तसेच राज्यात प्रथमच 27 ऑगस्ट रोजी मुंबईमधल्या वरळी येथे प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी देखील राज्य शासनाकडून गोविंदांना विमा संरक्षण दिले जाणार आहे.
रुग्णालयात स्वतंत्र कक्ष-
राज्यात दहींहडी उत्सवा दरम्यान अनेक तरुण उंच थर लावण्याचा सराव एक महिनाभरापासून सुरू करतात. त्यानंतर गोपाळ काल्या दिवशी दंही हंडीची स्पर्धा लागते. या स्पर्धेदरम्यान काही वेळा दुर्घटना होऊन दुखापत होण्याची शक्यता असत. त्यामुळे तसेच संभाव्य धोका गृहित धरून सरकारकडून खास अपघातग्रस्त गोविंदासाठी प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.