Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामात डिजिटल काटे अनिवार्य; काटामारी थांबल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामात डिजिटल काटे अनिवार्य; काटामारी थांबल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

Image Source : http://mpcb.ecmpcb.in

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपी (FRP) प्रमाणे प्रति टनास दर मिळतो. मात्र, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करताना काटा मारला जात असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून सर्व कारखान्यांचे काटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात येते. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून सकारात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत.

राज्यात ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून साखर कारखानदारांकडून काटा मारला जात असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येतात. याचीच दखल घेत यंदाच्या गाळप हंगापासून(2023) राज्यात सर्व साखर कारखान्यांना डिजिटल काटे (Online weigh bridge) वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडून होणारी काटा मारी थांबल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे.

साखर आयुक्त कार्यालयाकडून दखल

राज्यात बागायती पीक म्हणून ऊस पिकांचे सर्वाधिक लागवड केली जाते. त्यामुळे राज्यात साखर कारखानदारीचा उद्योगही मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. ऊस उत्पादक शेतकरी हे साखर कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करतात. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपी (FRP) प्रमाणे प्रति टनास दर मिळतो. मात्र, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करताना काटा मारला जात असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून सर्व कारखान्यांचे काटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात येते. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून सकारात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश-

साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात काटा मारला जात असल्याच्या तक्रारी दाखल होत होत्या. यासाठी राज्य साखर आयुक्तलयाकडून 2023च्या ऊस गाळप हंगामापासून सर्व साखर कारखान्यांना डिजिटल वजनकाटे कार्यान्वित करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या सदंर्भात 29 नोव्हेबर 2022 रोजी मुख्यमंत्र्यांनी वैध मापन शास्त्र यंत्रणेस साखर कारखान्यांना डिजिटल वजन काटे सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार या वजन काट्यांच्या अमंलबजावनंतर शेतकऱ्यांच्या मालाची काटेमारी थांबणार आहे.

शेतकऱ्यांना होणार फायदा

साखर कारखान्याला उस पाठवल्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाची एका खेपेमागे 500 किलो ते 2 टन इतकी काटे मारी केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी 5 ते 10 टन वजन कमी मोजले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत होता. मात्र डिजिटल काटे बसवल्यास शेतकऱ्यांच्या उसाचे योग्य वजन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कारखानदारांकडून केली जाणारी लूट थांबणार आहे. काटेमारी न झाल्यास शेतकऱ्यांचे एकरी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

कारखान्यात बसवले जाणारे सर्व काटे ऑनलाईन जोडले जातील. या डिजिटल यंत्रणेमुळे शेतकऱ्याच्या उसाचे वजन झाल्यानंतर तत्काळ याची माहिती साखर आयुक्त कार्यालय, साखर कारखाना प्रशासन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच या वजनाबद्दल शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना शंका आल्यास इतर काट्यावर वजन करून कारखान्याच्या काट्यांची पडताळणी करता येणार असल्याची माहिती वैधमापनशास्त्र विभागाचे अलकेश गेटमे यांनी दिली आहे.