Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

US Debt Ceiling Bill: नामुष्की टळली! अमेरिका दिवाळखोर होण्यापासून वाचला; संसदेत डेट सिलिंग बिल मंजूर

अमेरिकेवर सध्या 31.4 ट्रिलियन डॉलर कर्ज आहे. सरकारकडे कल्याणकारी योजना राबवण्यासाठी पैसे नाहीत. हा कर्जाचा आकडा देशाच्या एका वर्षातील संपूर्ण उत्पादनाएवढा आहे. मात्र, कायद्यानुसार एका ठराविक मर्यादेपेक्षा कर्ज घेता येत नव्हते. त्यामुळे दिवाळखोरीचे संकट उभे राहिले होते. दरम्यान, आता कर्ज मर्यादा वाढण्यासंबंधित विधेयक मंजूर झाले आहे.

Read More

Elon Musk : एलन मस्क पुन्हा जगातले सर्वात श्रीमंत! मे महिन्यात 29 अब्ज डॉलरनं वाढली संपत्ती

Elon Musk : टेस्लाचे मालक एलन मस्क पुन्हा एकदा जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवलंय. टेस्लाच्या स्टॉकमध्ये महिनाभरात 25 टक्क्यांहून अधिक वाढ झालीय. त्यामुळे एका महिन्याच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत 29 अब्ज डॉलरची वाढ झालीय.

Read More

MSRTC@75Years: विना तिकीट एसटीतून प्रवास केल्यावर किती दंड आकाराला जातो? जाणून घ्या

MSRTC@75Years: जर तुम्हीही दैनंदिन एसटीने प्रवास करत असाल, तर विना तिकीट प्रवास कधीही करू नका. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाने फरारी पथक तयार केले आहे. हे पथक चालत्या एसटीला थांबवून तिकीट तपासणी करू शकते. जर प्रवाशाकडे तिकीट नसेल, तर त्याला दंड भरावा लागतो. हा दंड नेमका किती असतो? जाणून घेऊयात.

Read More

MSRTC@75Years : 'गाव तिथे एसटी'मुळे लोकांचा नेमका काय फायदा झाला?

MSRTC@75Years : ग्रामीण भागासह सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून लालपरी म्हणजेच एसटी ओळखली जाते. म्हणूनच गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी म्हटलं जातं. राज्य मार्ग परिवहन मंडळाची ती एक संकल्पना आहे. राज्यातले बहुतांशी लोक ग्रामीण भागात राहतात. अशांना प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी, म्हणून शासनानं एसटी महामंडळामार्फत एसटी बस सुरू केली.

Read More

Fidelity report on Twitter : ट्विटरचं मूल्य आता केवळ 33 टक्के, 7 महिन्यात 29 बिलियन डॉलरची घसरण

Fidelity report on Twitter : एलन मस्क यांच्या ट्विटरचं मूल्य दिवसेंदिवस घसरत चाललंय. आता ते मूल्य केवळ 33 टक्क्यांवर आलंय. फिडेलिटीनं यासंदर्भात एक रिपोर्ट दिलाय. या रिपोर्टमध्ये एलन मस्क यांनी कंपनी घेतल्यापासून होत असलेल्या घसरणीबद्दल सविस्तर विवेचन करण्यात आलंय.

Read More

Karvy Stock Broker: कार्वी स्टॉक ब्रोकर कंपनीची नोंदणी रद्द; गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्यामुळे कारवाई

कार्वी स्टॉक ब्रोकर लिमिटेड (KSBL) या कंपनीची नोंदणी सेबीने रद्द केली आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने सेबीने ही मोठी कारवाई केली. कंपनीच्या मालकाला दंडही ठोठावण्यात आला आहे.

Read More

Indian GDP: भारतीयांसाठी चांगली बातमी! 2022-23 मध्ये आर्थिक वाढीचा वेग 7.2%

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. बुधवारी आर्थिक वर्ष 2022-2023 (FY23) आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यानुसार गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.1 टक्के राहिला आहे.

Read More

Food Storage Scheme: अन्नधान्य साठवणूक सुविधा वाढवण्यासाठी केंद्राची नवी योजना; 1 लाख कोटींची तरतूद

देशभरात गोदामे उभारण्याची नवी योजना केंद्र सरकारने लागू केली आहे. ही योजना सहकार विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. देशातील अन्नधान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे देशातील सहकार विभागातील अन्नधान्य साठवणुकीची क्षमता 700 लाख टन एवढी वाढणार आहे.

Read More

Airtel चे 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लॅन देतील तुम्हाला अनेक फायदे

Airtel Plans Under Rs 200 : भारतीय दूरसंचार कंपन्यांची ग्राहकांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी दररोजची स्पर्धा असते. यासाठी कंपन्या नवनवीन प्लॅन मार्केटमध्ये आणत असतात. आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध रिचार्ज योजना ऑफर करीत असतात. अशाच 200 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या योजना एअरटेल कंपनीने आणल्या आहे.

Read More

Skilled Workers Shortage: 81% उद्योगांना कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा; तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जॉब मार्केटमध्ये उलथापालथ

जगभरात कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही नवे कौशल्य शिकणे गरजेचे आहे. मात्र, विविध क्षेत्रातील कंपन्यांना कुशल कर्मचारी मिळत नाहीत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रात टेक्निकल स्किल्स असणे गरजेचे झाले आहे.

Read More

World No Tobacco Day : तंबाखूचं व्यसन अन् पैशांची नासाडी, सरकारही करतंय जनजागृती! वाचा, काय आहे विशेष...

World No Tobacco Day : तंबाखूचं सेवन आणि वापर हानिकारक आहे. याच्या घातक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्साठी दरवर्षी 31 मे हा दिवस जगभरात जागतिक तंबाखू विरोधी दिन (#WorldNoTobaccoDay) म्हणून पाळला जातो. तंबाखू आपल्याला किती हानीकारक आहे, त्यामुळे आरोग्यासह आर्थिक नुकसान आणि जनजागृती यावर माहिती घेऊ...

Read More

Farmers Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 हजार रुपये सन्माननिधी अन् 1 रुपयात पीक विमा..!

Farmers Scheme : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्रसरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसारखीच आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.

Read More