Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UMED : दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी

UMED

DDU-GKY : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचाच एक भाग म्हणून दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलामुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.

Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचाच एक भाग म्हणून दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. ग्रामीण भागातील 18 ते 28 वयोगटातील युवकांची मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून त्यांना विविध संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण युवकांना उपलब्थ असलेल्या किंवा होणाऱ्या संधीच्या दृष्टीकोनातून त्यांच्या कौशल्य क्षमतेचा विकास व्हावा यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. 

ही योजना कौशल्य विकास व रोजगार सृजन योजना प्रकारात मोडते. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार मुलामुलींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्धत करून देणे असा आहे. योजना ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार मुले, मुलीसाठी लागू आहे. आता  Orion Educational Society च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलामुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. 

योजनेच्या अटी

  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुले, मुली 
  • उमेदशी जोडलेल्या स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांच्या कुटुंबातील मुले, मुली 
  • महात्मा गांधी हमी योजनेचे लाभार्थी
  • या योजनेतील लाभार्थी  18 ते 28  वयोगटातील असले पाहिजेत
  • ग्रामीण भागातील 12 वी पास मुला, मुलीकरिता 

इतर डिटेल्स 

ITeS Professional या कोर्समध्ये (Customer Care Executive) या पदासाठी मुलामुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण मोफत दिले जाईल. ज्या उमेदवारांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि नियुक्त झालेले आहे. त्या सर्व उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीदरम्यान एक महिन्याच्या आत गणवेष मिळेल. प्रशिक्षण कालावधीच्या पहिल्या महिन्यात सर्व उमेदवारांसाठी बँकेचे खाते उघडून देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्तीनंतर सर्व उमेदवारांना DDU GKY Training Completion Certificate मिळेल. वर्कबुक्स, वहया आणि इतर अभ्यासाचे साहित्य यासहित सर्व प्रशिक्षणाचे साहित्य सर्व उमेदवारांना मोफत मिळेल.

अर्ज कसा करावा? 

प्लेसमेंटची 100 टक्के गॅरंटी घेण्यात आली आहे. Orion Educational Society च्या माध्यमातून ही रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी 7263908062 या मोबईल क्रमांकावर संपर्क करू शकता. Professional (Customer Care Executive) या पदासाठी प्रशिक्षण आपापल्या जिल्ह्यात दिले जाणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, राशन कार्ड
  • बी.पी.एल दाखला, जॉब कार्ड
  • बचत गट प्रमाणपत्र
  • टी. सी.
  • 10 वी, 12 वी मार्कशीट 
  • कास्ट सर्टिफीकेट, डोमीसाईल
  • ग्रा.पं. रहिवासी प्रमाणपत्र 
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • 4 पासपोर्ट फोटो