एलन मस्क मागच्या काही महिन्यांपासून श्रीमंतांच्या यादीत कधी एकवर तर कधी दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर घसरत होते. मस्क यांनी ट्विटर (Twitter) घेतल्यापासून त्यांच्या या स्थानाला धोकाच निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालीय. आता खालच्या क्रमांकावरून पुन्हा एकदा त्यांनी अग्रस्थान मिळवलंय. टेस्लानं (Tesla) त्यांना तारल्याचं दिसून येतंय. कारण टेस्लाचे शेअर्स 25 टक्क्यांपेक्षा अधिकनं वाढलेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत तब्बल 29 अब्ज डॉलरनं वाढ झालीय.
Table of contents [Show]
जागतिक उद्योगपतींची स्पर्धा
फ्रेन्च उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट आधी क्रमांक एकवर होते. 31 मे रोजी अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 5.25 अब्ज डॉलरची घट झाली. त्यांची एकूण संपत्ती 190 अब्ज डॉलरवर आलीय. जागतिक उद्योगपतींची ही स्पर्धा सुरू असताना भारतीय उद्योगपतींचं स्थान नेमकं कुठे आहे, हे ही पाहूया. गौतम अदानी पुन्हा एकदा चिनी उद्योगपतीच्या मागे पडले आहेत. आतापर्यंत ते आशियातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसरे होते. त्यांनी हे स्थान गमावलंय. एकूणच अग्रभागी असलेल्या उद्योगपतींच्या श्रीमंतांच्या यादीतल्या स्थानामध्ये काय काय बदल झालेत, हेही पाहू...
Elon Musk is now worth $192 billion and he is now the richest person alive pic.twitter.com/e20SqIzTJw
— Elon’s World (@elons_world) May 31, 2023
टेस्लाचा वाटा
टेस्ला ही जगातली एक मोठी ईव्ही ऑटो कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा इतिहास रचला. 31 मे रोजी त्यांच्या एकूण संपत्तीत 1.98 अब्ज डॉलरची वाढ झालीय. त्यानंतर आता त्यांची एकूण संपत्ती 192 अब्ज डॉलर झालीय. तर अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 5.25 अब्ज डॉलरची घट झालीय. आता त्यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलर राहिलीय. त्यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीनंतर मस्क यांनी पहिला क्रमांक पटकावलाय.
संपत्ती वाढवण्यात हे वर्ष आघाडीवर
मे महिना एलन मस्क यांच्यासाठी सकारात्मक ठरला. या महिन्यात त्ंयाच्या संपत्तीत 29 बिलियन डॉलरची वाढ झाली. साधारणपणे 1 मे रोजी त्यांची एकूण संपत्ती 163 अब्ज डॉलर होती. ती आता 192 बिलियन डॉलरवर पोहोचलीय. तर बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीमध्ये 2023मध्ये 24.5 अब्ज डॉलरची वाढ झालीय. दुसरीकडे, मस्क यांनी 55.3 अब्ज डॉलर जमा केले आहेत. दरम्यान, संपत्ती वाढवण्यात हे वर्ष या उद्योगपतींसाठी आघाडीवर राहिलं.
Elon Musk has reclaimed his position as the world’s wealthiest person. https://t.co/Win616HX0o
— CNN (@CNN) June 1, 2023
गौतम अदानी यांचा पराभव
भारतीय उद्योगपती गौतम अदानींची मात्र पिछेहाट झालीय. सलग दोन ते तीन दिवस अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झालीय. ते आधी 18व्या स्थानावर होते. आता 19व्या स्थानी त्यांची घसरण झालीय. 31 मे रोजी त्यांच्या संपत्तीत 310 दशलक्ष डॉलरची घट झाली. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 61.3 बिलियन डॉलरवर आली. अदानी यांच्या संपत्तीमध्ये या वर्षात 59.3 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतदेखील घट झालीय. त्यांच्या संपत्तीत 1.73 अब्ज डॉलरची घट झालीय. आता त्यांची एकूण संपत्ती 84.7 बिलियन डॉलर झालीय.