BSNL Recharge Plan For Dual Sim Card Users: अलीकडच्या काळात, भारतातील बहुतेक दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. यामुळे दोन सिमकार्ड असणाऱ्या युजर्सना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अशा ग्राहकांकरिता भारतीय दूरसंचार कंपनी बीएसएनएलने केवळ 22 रुपये किंमतीचं सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. 22 रुपयाच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 3 महिने म्हणजेच 90 दिवसांसाठी आहे. जर ग्राहक केवळ आपले सिम सक्रिय ठेवण्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असेल, तर हा अगदी उत्कृष्ट प्लॅन आहे.
22 रुपयांमध्ये 3 महिन्यांची व्हॅलिडिटी
भारतीय सरकारी कंपनी बीएसएनएल अनेक प्रकारचे स्वस्त प्लॅन ऑफर करते. त्यात आता आणखी एका प्लॅनची भर पडली. BSNL चा 22 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला 30 पैसे प्रति मिनिट दराने लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जाते. परंतु यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग आणि डेटाचे फायदे मिळत नाहीत. मात्र, ग्राहकांना सिम अॅक्टिवेट ठेवण्यासाठी हा सर्वात स्वस्त प्लॅन मिळत आहे.
BSNL चे इतर स्वस्त रिचार्ज प्लॅन
BSNL चा हा 22 रुपयांचा प्लॅन किफायतशीर आणि सिम सक्रिय ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या प्लॅन मुळे तुम्ही दुसरे सिम म्हणजेच तुमच्याकडे व्यतिरिक्त कामांसाठी असलेले सिम महागडे रिचार्ज न मारता सक्रिय ठेवू शकाल. आणि 3 महिन्यांची व्हॅलिडिटी असल्यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.
याशिवाय, BSNL कंपनीचा सर्वात स्वस्त बेसिक प्लॅन 18 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा प्लॅन ग्राहकांना 2 दिवसाच्या वैधतेसह उपलब्ध आहे. या दोन दिवसात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1 GB डेटा पुरवण्यात येणार आहे. ग्राहकांना देण्यात आलेला 1 GB डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 80 Kbps होईल.
त्यानंतर, 30 दिवसांच्या वैधतेसह ग्राहकांना BSNL कंपनी 75 रुपयांचा स्वस्तातील प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये ग्राहकांना पर्सनलाईज रिंगटोनची (Personalized Ringtone) सुविधा दिली जात आहे. सोबत 200 मिनिटांचा लोकल आणि एसटीडी टॉकटाईम  मिळणार आहे. तसेच 2GB इंटरनेट डेटाही देण्यात आला आहे.  
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            