Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Roadside Assistance Service : प्रवासा दरम्यान कार खराब झाल्यास वापरा 'रोड साइड असिस्टंस सेवा'; काही मिनिटांत मिळेल मदत

Roadside Assistance Service : बऱ्याचदा दूरच्या प्रवासासाठी कारचा वापर केला जातो. अनेकदा प्रवास चालू असतानाच गाडी खराब होते. अशा परिस्थितीत मदत मिळवणे कठीण होते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. काही निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर 'रोड साइड असिस्टंस सेवा' देण्यात येत आहे. या सेवेबद्दल जाणून घेऊयात.

Read More

JSW Foundation Fellowship : JSW फाऊंडेशन फेलोशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळू शकतं 30 हजार रुपयांपर्यंत मानधन

JSW Foundation Fellowship : JSW फाउंडेशन फेलोशिप हा दोन वर्षांचा युवा नेतृत्व कार्यक्रम आहे, जो देशातील सर्वात आशावादी तरुणांसाठी आहे, जो त्यांना सामाजिक विकासाच्या दृष्टीने सक्षम करतो आणि सामाजिक बदलासाठी प्रेरित करतो. जाणून घेऊया, या फेलोशिपबाबत सविस्तर माहिती.

Read More

Air Fare Hike: विमानप्रवासाची भाडेवाढ गगनाला! एयरलाईन्सशी सरकार करणार चर्चा

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान प्रवासी भाड्याची मर्यादा काढून टाकली आहे, त्यामुळे सरकारला भाडेवाढीबद्दल हस्तक्षेप करता येत नाही. याच कारणामुळे खासगी कंपन्या विमानाच्या किमती या मागणीच्या आधारे ठरवत असतात. विमान प्रवासाच्या तिकिटांची स्पर्धात्मक किंमती सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे.

Read More

HDFC Banking: जून महिन्यात 2 दिवस HDFC ग्राहकांच्या 'या' सेवा राहणार बंद

HDFC बँकेच्या सेवा कधी बंद राहतील याची माहिती ईमेलद्वारे बँकेकडून ग्राहकांना देण्यात आली आहे. बॅंकेकडून सांगण्यात आले की बँकेच्या आयटी सिस्टमची देखभाल आणि अपग्रेडेशनसाठी नियोजितवेळी ग्राहकांना काही सुविधांचा वापर करता येणार नाहीये.

Read More

MotoGP In India: आता भारतात रंगणार मोटारसायकल रेसिंगचा थरार! सप्टेंबरमध्ये MotoGP Bharat चॅम्पियनशीपचे आयोजन

MotoGP In India: भारतात मोटोजीपी वर्ल्ड चॅम्पियनशीपचे आयोजन फेअरस्ट्रीट स्पोर्ट्सकडून करण्यात आले आहे. 22 ते 24 सप्टेंबर 2023 असे तीन दिवस ही स्पर्धा होणार आहे. मोटारसायकल रेसिंग पहिल्यांदाच भारतात होत असल्याने या स्पोर्ट्सच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Read More

Tulip Turbine for Home Usage: घरच्या घरी बनवता येणार वीज! आता वाढत्या वीजबिलाची चिंता नको!

एकदा की पवनचक्की बसवली की निरंतर वीजनिर्मितीचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होत असतो. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की ही पवनचक्की लावायची कशी? तिला खर्च किती येतो आणि वीजनिर्मिती कशी होते? चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती या लेखात...

Read More

BSE NSE : बीएसई आणि एनएसईचा मोठा निर्णय, कंपन्यांवरचं मॉनिटरिंग वाढणार

BSE NSE : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आता कंपन्यांवर आपलं मॉनिटरिंग वाढवणार आहेत. स्मॉल कॅप काउंटरमधली अस्थिरता रोखण्यासाठी बीएसई आणि एनएसईनं 500 कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांवर देखरेख वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

Read More

Mother dairy: विदर्भात मदर डेअरीचा मेगा प्रोजेक्ट; 400 कोटींची गुंतवणूक करणार

विदर्भात मदर डेअरीचा 400 कोटींचा प्रकल्प उभा राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यासाठी 10 हेक्टर जमीनही देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल तसेच रोजगार निर्मितीही होईल, असे गडकरी यांनी म्हटले. मदर डेअरी हा सरकारी मालकीचा उपक्रम आहे.

Read More

Petrol diesel price : पेट्रोल-डिझेल स्वस्त नाहीच, सौदी अरेबियाच्या निर्णयानं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

Petrol diesel price : सौदी अरेबियाकडून भारतासाठी एक नकारात्मक बातमी आहे. सातत्यानं वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची आशा आता धुसर झालीय. ओपेक प्लसच्या झालेल्या बैठकीत भारताला मोठा झटका बसलाय. सौदी अरेबियानं घेतलेल्या निर्णयानं इंधन दरवाढ कमी होण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय.

Read More

Amazon Delivery मध्ये आता येणार नाही डिफेक्टीव्ह सामान, कंपनीने आणली नवी योजना!

लॉजिस्टिकमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय अॅमेझॉनने घेतलाय. ग्राहकांना सुस्थितीत त्यांनी ऑर्डर केलेल्या वस्तू मिळाव्यात यासाठी कंपनी त्यांच्या गोदामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या तयारीत आहे. आता थेट गोदामांमध्ये एआय चा (Artificial Intelligence) वापर अमेझॉन करणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

MSRTC @75 : 'एसटीच्या सवलत पासमुळेच आज आयुष्य वेगळ्या वळणावर...' नागपुरातला विद्यार्थी सांगतोय एसटीचं महत्त्व

MSRTC @75 : 1 जूनला आपल्या लालपरीला 75 वर्ष पूर्ण झालेत. या 75 वर्षात लालपरीने प्रत्येकाच्या आयुष्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात तर एसटीला फार महत्त्वाचे स्थान आहे. नागपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने एसटी बसच्या सहकार्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. जाणून घेऊया त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात एसटीचे महत्त्व...

Read More

Education Loan Scam: बंगळुरात शैक्षणिक कर्जातून 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक, गिकलर्नच्या सीईओला अटक

Education Loan Scam: डेटा सायन्स कोर्ससाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देऊन गिकलर्नचा सीईओ श्रीनिवास याने 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे.श्रीनिवास याने प्रत्येक विद्यार्थ्याची किमान 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. या शैक्षणिक कर्जाच्या फसवणुकीतून 18 कोटींचा घोटाळा झाला आहे.

Read More