Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

BSNL Special Package: BSNL 4G आणि 5G साठी केंद्र सरकार देणार 89,047 कोटींचा निधी, BSNL कात टाकणार…

BSNL समोर सध्याच्या घडीला अनेक आव्हाने आहेत. रिलायन्स जिओने स्वस्त दरात ग्राहकांना 5G सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक ग्राहकांनी जिओची वाट धरली आहे. जिओ नंतर एअरटेल कंपनीने देशभरात 5G इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढत्या मक्तेदारीमुळे आणि BSNL च्या अपुऱ्या सेवेमुळे ग्राहकांनी BSNL कडे पाठ फिरवली आहे.

Read More

Mumbai unused road : वर्षभरानंतरही मुंबईतला रस्ता वापराविना पडून, 11 कोटी रुपयांचा चुराडा

Mumbai unused road : मुंबईमधला एक रस्ता बांधून तयार आहे. या रस्त्यासाठी तब्बल 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र आता एक वर्ष होत आलं, तरी रस्त्याचा वापरच नाही. त्यामुळे एवढा मोठा खर्च वाया गेला आहे.

Read More

Food License Renewal Process and Cost: फूड लायसन्स रिन्यू करण्याची प्रक्रिया आणि खर्च जाणून घ्या.

Food License Renewal Process and Cost: खाद्यपदार्था संदर्भात व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना फूड लायसन्स (Food License) काढणे गरजेचे असते. हे लायसन्स FSSAI विभागाकडून काढले जाते. तर याच विभागाकडून त्याची रिन्यू प्रोसेस देखील केली जाते. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे होते. त्यासाठी किती खर्च येतो, जाणून घेऊयात.

Read More

Ivan Menezes Passes Away: मद्यसम्राट हरपला! 'डियाजिओ'चे सीईओ इव्हान मेनेझेस यांचे निधन, पुण्याशी होते खास नाते

Ivan Menezes Passes Away: कंपनीने इव्हान मेनेजेस यांच्या उत्तराधिकारी म्हणून डेब्रा क्रू यांची 28 मार्च 2023 रोजी घोषणा केली होती. डेब्रा क्रू या डियाजिओच्या इतिहासातील पहिला महिला सीईओ आहेत.येत्या 30 जून 2023 रोजी इव्हान मेनेझेस सीईओ पदावरुन निवृत्त होणार होते.

Read More

FDI In Maharashtra: थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल, भारतातील FDI मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

FDI In Maharashtra: राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे निर्माण झालेले संभ्रमाचे मळभ आता दूर झाले आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतणूकदारांच्या पहिल्या पसंतीचे राज्य ठरले आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये महाराष्ट्रात 1.18 लाख कोटींची परकीय गुंतवणूक झाली. भारतातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा 29% वाटा असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Read More

EPFO Stock Investment : पीएफचा पैसा आता जोखमीच्या अधीन? शेअर्समधली गुंतवणूक वाढवण्याचा ईपीएफओचा विचार

EPFO Stock Investment : सर्वसामान्यांच्या पीएफमधला पैसा आता अधिक धोक्याच्या पातळीवर येणार असल्याचं दिसतंय. आपल्या कष्टानं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याच्या हेतूने पीएफमध्ये ठेवला जातो. भविष्यकाळातली ती एक तरतूद असते. हे करत असताना कोणतीही जोखीम असता कामा नये, हा सर्वांचा उद्देश असतो. मात्र ईपीएफओ वेगळाच निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

Read More

Bajaj Finserv ची म्युच्युअल फंड व्यवसायात उडी; 7 नव्या फंड योजना लवकरच जाहीर करणार

Bajaj finserv AMC ही Bajaj Finserv ची उपकंपनी असून कंपनीचे मुख्यालय पुणे असेल. पुण्यामध्ये पहिल्यांदाच एखाद्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्यालय सुरू झाले आहे. भारतातील ही 43 वी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. पुढील 30 दिवसांत कंपनी गुंतवणुकीच्या विविध योजना आणणार आहे. तसेच सात New Fund Offer (NFO) कंपनी लवकरच जाहीर करणार आहे.

Read More

RBI on KYC Update: हयातीचा दाखला सादर करणे होणार सोपे! कुठल्याही बँक शाखेत सादर करता येणार दाखला

RBI ला सादर केलेल्या शिफारसीनुसार पेन्शनधारकांना त्यांच्या बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन हयातीचा दाखला सादर करण्याची मुभा द्यायला हवी असे म्हटले आहे. तसे केल्यास ज्येष्ठ नागरिक त्यांच्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या बँक शाखेत जाऊन बँकिंगची कामे करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांचा प्रवासाचा त्रास यामुळे टाळता येऊ शकतो असे या अहवालात सुचवले आहे.

Read More

Kerala Free Internet: केरळ सरकारने सुरु केली स्वत:ची इंटरनेट सेवा, गरिबांना मिळणार मोफत हायस्पीड इंटरनेट

Kerala Free Internet: K-FON अर्थात केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्कचा राज्यातील जवळपास 20 लाख नागरिकांना फायदा होणार आहे. केरळाला नॉलेज इकॉनॉमीमध्ये परावर्तीत होण्यात मोफत इंटरनेट सेवा महत्वाचे योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री विजयन यांनी व्यक्त केला.

Read More

IRCTC Ticket Name Change Rule: बुकिंग केलेल्या ट्रेनच्या तिकीटवरील नावात बदल करता येतो का? रेल्वेचा नियम काय सांगतो?

IRCTC Ticket Name Change Rule: ऑनलाईन तिकीट बुक करताना आपल्याकडून झालेल्या छोट्या चुकीमुळे तिकिटावरील नावात बदल होतो आणि चुकीच्या नावाने तिकीट बुक होते. अशा परिस्थितीत बरेच जण तिकीट कॅन्सल करतात किंवा नवीन तिकीट काढतात. बुक केलेल्या तिकीटवरील नाव बदलण्याची सुविधा भारतीय रेल्वे देते की नाही याबाबत माहिती जाणून घ्या.

Read More

Paytm GMV : पेटीएमचा जीएमव्ही 35 टक्क्यांनी वाढला, कशी होतेय कमाई? वाचा...

Paytm GMV : पेटीएमचा जीएमव्ही 35 टक्क्यांनी वाढलाय. सध्या पेटीएमचा जीएमव्ही म्हणजेच सकल व्यापारी मूल्य 2.65 लाख कोटी रुपये झालंय. त्यामुळे कंपनीची वाटचाल नफ्याच्या दिशेनं चाललीय. कारण मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा जीएमव्ही 1.96 लाख कोटी रुपये होता.

Read More

Butterfly Film Offer: बटरफ्लाय सिनेमाची अनोखी ऑफर; एका तिकिटावर दोघांना सिनेमा पाहता येणार!

Butterfly Film Offer: मीरा वेलणकर दिग्दर्शित 'बटरफ्लाय' हा चित्रपट 2 जून 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत असून चित्रपटाच्या टीमकडून प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. दोन व्यक्तींच्या तिकिटावर 50 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट कुठे आणि कसा मिळवायचा जाणून घेऊयात.

Read More