LIC buys shares in Tech Mahindra: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. या कंपनीत आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळे प्लॅन असणारे इन्शुरन्स खरेदी केले आहेत. नुकतेच एलआयसीने आयटी टेक कंपनी महिंद्राचे (Tech Mahindra) शेअर्स खरेदी करून आपली भागीदारी वाढवली आहे. टेक महिंद्रामधील 2.01% शेअर्स एलआयसीने खरेदी केले आहेत. या शेअर्स खरेदीनंतर एलआयसीकडे टेक महिंद्रातील एकूण 8.88% शेअर्स आहेत.
केवळ सहा महिन्यात एलआयसीने Open Transaction च्या माध्यमातून ही भागीदारी वाढवली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 21 नोव्हेंबर 2022 ते 6 जून 2023 या कालावधीत टेक महिंद्राचे 2.01% शेअर्स खरेदी करण्यात आले आहेत. या शेअर्सचे खरेदी मूल्य प्रति शेअर्स 1050.77 रुपये इतके आहे.
एलआयसीची भागीदारी 8.884% पर्यंत पोहचली
एलआयसीने (LIC) एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, टेक महिंद्रा कंपनीत एलआयसीची भागीदारी 6.69 कोटी इक्विटी शेअर्सवरून वाढून 8.65 कोटी इक्विटी शेअर्स इतकी झाली आहे. ज्यामुळे एलआयसीच्या शेअर होल्डिंगमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ थेट 6.869% वरून 8.884% पोहचली आहे. मार्च 2023 पर्यंत एलआयसीकडे टेक महिंद्रा कंपनीचे 8.07% भागीदारी आणि 7.86 कोटी इक्विटी शेअर्स होते. ज्यामध्ये आता वाढ झाली आहे.
टेक महिंद्राच्या शेअर्सचे अपडेट जाणून घ्या
काल (7 जून 2023) टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये 0.85% वाढ पाहायला मिळाली. या वाढीसह हा स्टॉक 1,095.50 रुपये भावाने बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 5% वाढ दिसून आली आहे. असे असले तरीही कंपनीने गेल्या सहा महिन्यात 2% रिटर्न दिला आहे. यावर्षी कंपनीचे शेअर्स 8% पर्यंत चढले असून मागील 3 वर्षात या शेअर्सने 97% पर्यंत रिटर्न्स दिले आहेत.
इक्विटी म्हणजे काय?
स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इक्विटी हा शब्द अनेकदा ऐकला असेल, पण तुम्हाला इक्विटी आणि शेअर्समध्ये नेमका फरक काय, याबद्दल माहिती आहे का?
इक्विटी (equity) म्हणजे एखाद्या कंपनीची मालकी घेणे. जसे की तुम्हाला माहीतच असेल की, एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेणे. म्हणजेच त्या कंपनीतील एक छोटासा हिस्सा विकत घेणे. गुंतवणुकीच्या भाषेत याच छोट्याशा हिस्स्याला इक्विटी असं म्हणतात. एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपण त्या कंपनीची इक्विटी म्हणजेच मालकी विकत घेत असतो.
Source: hindi.moneycontrol.com