Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO Stock Investment : पीएफचा पैसा आता जोखमीच्या अधीन? शेअर्समधली गुंतवणूक वाढवण्याचा ईपीएफओचा विचार

EPFO Stock Investment : पीएफचा पैसा आता जोखमीच्या अधीन? शेअर्समधली गुंतवणूक वाढवण्याचा ईपीएफओचा विचार

EPFO Stock Investment : सर्वसामान्यांच्या पीएफमधला पैसा आता अधिक धोक्याच्या पातळीवर येणार असल्याचं दिसतंय. आपल्या कष्टानं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याच्या हेतूने पीएफमध्ये ठेवला जातो. भविष्यकाळातली ती एक तरतूद असते. हे करत असताना कोणतीही जोखीम असता कामा नये, हा सर्वांचा उद्देश असतो. मात्र ईपीएफओ वेगळाच निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

ईपीएफओ (Employee's Provident Fund Organisation) शेअर्समधली आपली गुंतवणूक वाढवणार आहे. सरकारी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) याच पैशांची काळजी घेते. देशातल्या सुमारे 6 कोटी लोकांच्या पीएफ खात्यात ईपीएफओचे पैसे जमा आहेत. ईपीएफओ वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक (Investment) करून त्यावर व्याज मिळवते आणि नंतर आपल्या कॉन्ट्रीब्यूटर्सना त्याचं वाटप करते. यातला काही हिस्सा ईपीएफओ शेअर बाजारातही इन्व्हेस्ट करते. शेअर बाजारातली गुंतवणूक ही खरं तर धोक्याची, जोखीम असलेली मानली जाते. मात्र तरीही ईपीएफओ ​​पूर्वीपेक्षा शेअर बाजारात आपली गुंतवणूक वाढवणार आहे. टीव्ही 9नं हे वृत्त दिलंय.

इक्विटी आणि इतर पर्यायांचा विचार

शेअर बाजारातली गुंतवणूक ईपीएफओ वाढविण्याच्या विचारात आहे. त्याचप्रमाणे एक्स्चेंज ट्रेडेड फंडांद्वारे जमा केलेले पैसे इक्विटी आणि इतर पर्यायांमध्येही पुन्हा गुंतवले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईपीएफओ ​​लवकरच या संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मागणार आहे. यामुळे जास्तीत जास्त परतावादेखील मिळू शकणार आहे, असं ईपीएफओचं मत आहे.

शेअर बाजारात थेट गुंतवणूक वाढणार

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं या संदर्भात मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच विचार विनिमय केला होता. मार्चमध्ये झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातही याचा उल्लेख आहे. मिनिट्सनुसार, ईटीएफमध्ये केलेले पैसे आता इक्विटी किंवा इतर संबंधित पर्यायांमध्ये गुंतवले जावेत, असं ईपीएफओचं म्हणणं आहे. असं केल्यास ईपीएफओ​ची शेअर बाजारात थेट गुंतवणूक वाढणार आहे. ती शेअर्समधल्या गुंतवणुकीच्या 15 टक्के मर्यादेच्या जवळ जाईल.

वित्त मंत्रालयाच्या पॅटर्ननुसार गुंतवणूक

ईपीएफओ आपल्या निधीची गुंतवणूक वित्त मंत्रालयाच्या पॅटर्ननुसार करत असतं. सध्या ईपीएफओ ईटीएफद्वारे इक्विटीमध्ये दरवर्षी वाढणाऱ्या ठेवींपैकी केवळ 5 ते 15 टक्के गुंतवणूक करू शकतं. बाकीचे पैसे त्याला डेब्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवावे लागतात. ईटीएफ रिडीम केल्यानंतर येणारे पैसे कसे वापरायचे, याबद्दल कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वं नाहीत.

बचतीवरची जोखीम वाढणार?

ईपीएफओचं म्हणणं आहे, की जानेवारी 2023च्या आकडेवारीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची केवळ 10 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली गेलीय. तर फंडाच्या 15 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवण्याची परवानगी आहे. ईपीएफओनं 2015-16 पासून ईटीएफच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

ईपीएफओची ईटीएफमधली गुंतवणूक

31 मार्च 2022 पर्यंत ईपीएफओ​​नं ईटीएफमध्ये एकूण 1,01,712.44 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हे त्यांच्या एकूण 11,00,953.55 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या 9.24 टक्के इतकं प्रमाण आहे. यातून जास्तीत जास्त परतावा मिळावा, अशी ईपीएफओची अपेक्षा आहे. 

जोखीम वाढणार

शेअर बाजारात सध्या अस्थिरता आहे. अशावेळी ईपीएफओचा गुंतवणुकीचा निर्णय धोक्याचा ठरू शकतो. सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे धोक्यात घालण्यासारखं आहे, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. सर्वसामान्यांसाठी ईपीएफओ एक विश्वासू पर्याय आहे. कारण गुंतवणुकीसाठी बाजारात इतर अनेक योजा कार्यरत आहे. म्युच्युअल फंड त्याचप्रमाणे इतर स्मॉल कॅप, मिड कॅपचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र ईपीएफओ जोखीम मुक्त असल्यानं त्याला पसंती दिली जाते. आता या निर्णयाचा काय परिणाम होतो, हे भविष्यातच समजणार आहे.