Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSP Hike: सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट; तांदूळ, डाळींच्या हमीभावात वाढ

MSP Price Hike

Pulses MSP Hike:केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने विविध धान्यांवरील किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने हा निर्णय 2023-24 या आर्थिक वर्षासाठी घेतला आहे.

Pulses MSP Hike: केंद्र सरकारने खरीप पिकांच्या पार्श्वभूमीवर 2023-24 या आर्थिक वर्षासाठी विविध धान्यांच्या हमीभावामध्ये वाढ करण्यास संमती दिली आहे. सरकारने मुगाच्या डाळीमध्ये सर्वाधिक म्हणजे 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर तांदळाच्या हमीभावामध्ये 143 रुपयांची वाढ केली असून सरकार आता शेतकऱ्यांकडून 2183 रुपये प्रति क्विंटल या दराने तांदूळ विकत घेणार आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मिडियाशी बोलताना याबाबतची माहिती दिली. गोयल यांनी सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी त्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरकारने काही प्रमुख धान्यांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. चांगल्या दर्जाचा म्हणजेच क्रमांक 1 चा तांदूळ शेतकऱ्यांकडून खरेदी करताना सरकार प्रति क्विंटल 2203 रुपये हमीभाव देणार आहे.

जाणून घ्या कोणत्या धान्यांच्या किमतीत किती केली वाढ

मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी महत्त्वाच्या धान्यांच्या खरेदीच्या हमीभावामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उडदाची डाळ शेतकऱ्यांकडून खरेदी करताना शेतकऱ्यांना प्रति क्विंटलमागे 6,950 रुपये भाव दिला जाणार आहे. सरकारने उडदाच्या डाळीच्या पूर्वीच्या भावामध्ये 350 रुपयांची प्रति क्विंटलमागे वाढ केली आहे. मक्याच्या पिकामध्ये 128 रुपये, साधारण तांदळाच्या खरेदीमध्ये 143 रुपयांची वाढ केली आहे.ज्वारीच्या एका क्विंटलचा खरेदी भाव 3,180 रुपये असणार आहे. तुरीच्या डाळीमध्ये प्रति क्विंटलमागे 400 रुपयांची वाढ केली आहे. तर मुगाच्या डाळीच्या भावामध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मूग डाळीचा प्रति क्विंटल खरेदी करण्याचा भाव 8,558 रुपये असणार आहे.

हमीभाव म्हणजे काय?

हमीभाव (Minimum Support Price-MSP) म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची आधारभूत किंमत आहे. म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून तो माल खरेदी करता येणार नाही. त्याची किमान किंमत सरकार हमीभावाच्या माध्यमातून ठरवते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत नाही.

डाळींवरील खरेदी मर्यादा हटवली

सरकारने तूर, उडद आणि मसूर या डाळींच्या हमीभावामध्ये वाढ करण्याबरोबरच याची खरेदी करण्याची 40 टक्क्यांची लिमिटसुद्धा हटवण्यात आली आहे. पूर्वी या डाळींची खरेदी करण्यावर मर्यादा होत्या.