Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BSNL Special Package: BSNL 4G आणि 5G साठी केंद्र सरकार देणार 89,047 कोटींचा निधी, BSNL कात टाकणार…

BSNL Package

BSNL समोर सध्याच्या घडीला अनेक आव्हाने आहेत. रिलायन्स जिओने स्वस्त दरात ग्राहकांना 5G सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक ग्राहकांनी जिओची वाट धरली आहे. जिओ नंतर एअरटेल कंपनीने देशभरात 5G इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढत्या मक्तेदारीमुळे आणि BSNL च्या अपुऱ्या सेवेमुळे ग्राहकांनी BSNL कडे पाठ फिरवली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज BSNL बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

बीएसएनएल ही दूरसंचार क्षेत्रातील सरकारी कंपनी असून, देशातील नागरिकांना कमी दरात उत्तम सेवा देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत कॅबिनेटने BSNL साठी 89,047 कोटी रुपयांच्या स्पेशल पॅकेजला मंजुरी दिली आहे. ही रक्कम BSNL च्या 4G आणि 5G सेवा वाढवण्यासाठी वापरली जाईल असे सरकारने म्हटले आहे. दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत बीएसएनएल टिकून रहावी आणि त्यांना नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा देता यावी यासाठी ही मदत दिली जात आहे असे सरकारने म्हटले आहे.

BBNL आणि BSNL चे विलनीकरण 

भारत ब्रॉडबँड नेटवर्क लि. (Bharat Broadband Network) ही 2012 मध्ये स्थापन केलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी देखील दूरसंचार विभागामार्फत चालवली जाते. देशातील गावाखेड्यात ब्रॉडबँड सुविधा पोहोचावी यासाठी ही कंपनी प्रयत्नशील आहे. गेल्या एकाही वर्षात ‘डिजिटल इंडिया’चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या कंपनीने महत्वाचे योगदान दिले आहे. आता या कंपनीचे BSNL सोबत विलनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे असे आज स्पष्ट करण्यात आले आहे.  

या विलनीकरणामुळे येत्या काळात सरकारी दूरसंचार क्षेत्र मजबुतीने काम करणार आहे असा विश्वास सरकारला वाटतो आहे. BBNL आणि BSNL चे विलनीकरण झाल्यानंतर BBNL च्या ऑप्टीकल फायबरची संपूर्ण व्यवस्था बीएसएनएलच्या ताब्यात येईल. यामुळे सरकारला खेड्यापाड्यात जलद गतीने इंटरनेट सुविधा पुरवणे शक्य होणार आहे.

BSNL पुढील आव्हाने 

बीएसएनएल समोर सध्याच्या घडीला अनेक आव्हाने आहेत. रिलायन्स जिओने स्वस्त दरात ग्राहकांना 5G सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक ग्राहकांनी जिओची वाट धरली आहे. जिओ नंतर एअरटेल कंपनीने देशभरात 5G इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढत्या मक्तेदारीमुळे आणि BSNL च्या अपुऱ्या सेवेमुळे ग्राहकांनी BSNL कडे पाठ फिरवली आहे. अशातच ग्रामीण भागात कंपनीला अपुऱ्या संसाधानात सेवा पुरवताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा काळात केंद्र सरकारने BSNL ला दिलेली ही आर्थिक मदत अनेकदृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

BSNL लवकरच 4G नेटवर्कचा विस्तार करणार आहे. खासगी कंपन्यांनी देशभरात 5G सेवेचा विस्तार करण्याचा धुमधडाका लावलेला असताना BSNL आता कुठे 4G इंटरनेटसाठी प्रयत्न करणार आहे.  त्यासाठी स्पेक्ट्रम घेण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील BSNL कंपनीला 33,0000 कोटी रुपयांच्या इक्विटीत रुपांतरीत केले जाणार आहे. सोबतच कंपनीची कर्जे फेडण्यासाठी लवकरच बॉंड जारी करण्यात येतील असेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.