Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Food License Renewal Process and Cost: फूड लायसन्स रिन्यू करण्याची प्रक्रिया आणि खर्च जाणून घ्या.

Food License Renewal Process and Cost

Image Source : www.scribd.com

Food License Renewal Process and Cost: खाद्यपदार्था संदर्भात व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना फूड लायसन्स (Food License) काढणे गरजेचे असते. हे लायसन्स FSSAI विभागाकडून काढले जाते. तर याच विभागाकडून त्याची रिन्यू प्रोसेस देखील केली जाते. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे होते. त्यासाठी किती खर्च येतो, जाणून घेऊयात.

हल्ली आपल्याला प्रत्येक गल्ली-बोळात छोटी मोठी हॉटेल्स उभारलेली पाहायला मिळतात. मात्र ही हॉटेल्स चालवण्यासाठी फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (Food Safety and Standard Authority of India) फूड लायसन्स काढावी लागतात. ही लायसन्स काढल्याशिवाय कोणतेही खाद्य पदार्थाचे हॉटेल सुरू करता येत नाही. खाद्य पदार्थांचे मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि डिस्ट्रिब्युशन करण्यासाठी देखील फूड लायसन्सची गरज असते. हे लायसन्स काढल्यानंतर याची वैधता 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत असते. लायसन्सची वैधता संपण्यापूर्वी 1 महिना त्या लायसन्सला रिन्यू करण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. जर व्यावसायिकाने लायसन्सची वैधता संपल्यावर देखील काम चालू ठेवले, तर त्याला मोठ्या रकमेचा दंड होऊ शकतो. त्यामुळे फूड लायसन्स ऑनलाईन आणि ऑफलाईन कसे रिन्यू करायचे आणि त्यासाठी किती खर्च येतो, याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

अशा प्रकारे ऑनलाईन फूड लायसन्स रिन्यू करा

स्टेप 1: ऑनलाईन (online) फूड लायसन्स रिन्यू करण्यासाठी तुम्हाला FSSAI च्या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

स्टेप 2: त्यानंतर लायसन्स रिन्यूवल टॅबवर क्लिक करावे लागेल. हा टॅब ओपन झाल्यावर तुमच्यापुढे एक फॉर्म ओपन होईल, जो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल.

स्टेप 3: फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

स्टेप 4: तुम्ही केलेल्या अर्जाची तपासणी करून लायसन्स रिन्यू करण्यात येईल. रिन्यू झालेले फूड लायसन्स नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवले जाईल. जिथून व्यावसायिक डाउनलोड करू शकतो. 

ऑफलाईन फूड लायसन्स अशा प्रकारे रिन्यू करा

स्टेप 1: फूड लायसन्स ऑफलाईन (Offline) रिन्यू करण्यासाठी तुम्हाला फॉर्म-ए आणि फॉर्म-बी भरावा लागेल. हा फॉर्म तुम्ही जिल्ह्याच्या फूड सेफ्टी ऑफिसरच्या कार्यालयातून किंवा FSSAI च्या पोर्टलवरून डाउनलोड करता येईल.  

स्टेप 2: फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍक्ट (Food Safety and Standard Act) अंतर्गत फूड लायसन्समधील सर्व बंधनकारक नियमांचे पालन करण्यासंदर्भातील सेल्फ डिक्लरेशन फॉर्म तुम्हाला भरून तो फूड सेफ्टी ऑफिसरच्या कार्यालयात जमा करावा लागेल.

स्टेप 3: तुम्ही केलेल्या अर्जाची आणि तुमच्या व्यवसायाच्या जागेची तपासणी केली जाईल.  त्यानंतर हा रिपोर्ट पुढे पाठवला जातो.

स्टेप 4: अर्ज केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत फूड लायसन्सला रिन्यू केले जाईल. अर्जामध्ये काही कमतरता असले, तर त्यासंदर्भात माहिती अर्जदाराला कळवली जाईल. त्यानंतर अर्जदार पुन्हा अर्ज अपडेट करून सबमिट करू शकतो.

फूड लायसन्स रिन्यू करायला किती खर्च येतो?

तुमच्या व्यवसायाच्या वार्षिक उलढालीच्या आधारावर फूड लायसन्स रिन्यू करण्याची रक्कम निर्धारित केली जाते. ही रक्कम 100 रुपयांपासून ते 7500 रुपयांपर्यंत असते. यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही याठिकाणी क्लिक करू शकता.

Source: abplive.com