मेटाचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी मेटा चॅनलच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. ही सेवा आता भारत, यूके आणि कॅनडामध्ये उपलब्ध असणार आहे, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, ब्राझीलमध्येही ही सेवा लवकरच लॉन्च केली जाणार आहे. जे अकाउंट आधीच व्हेरिफाइड झाले आहेत, त्यांना ब्लू टिक (Blue tick) पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
Table of contents [Show]
फेब्रुवारीतच सुरू केली होती सर्व्हिस
मेटा कंपनीनं या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपली पेड सबस्क्रिप्शन सेवा म्हणजेच मेटा व्हेरिफाइड सर्व्हिस लाँच केली होती. मात्र, सुरुवातीला ती केवळ यूएसमध्येच उपलब्ध होती. नंतर, एका अपडेटनंतर ती यूकेमध्ये 16 मार्चला आणि कॅनडामध्ये 31 मार्चला उपलब्ध करून देण्यात आली. आता या यादीत भारताच्या नावाचादेखील समावेश करण्यात आलाय.
किती शुल्क?
मार्क झुकरबर्ग आणि मेटा मेटा व्हेरिफाइड पेजनं भारतातल्या या पेड सर्व्हिसची माहिती दिली. तुम्ही मेटा व्हेरिफाइड पेजवर गेल्यानंतर तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये सामील होण्यास सांगितलं जाईल. या पेजवर तुम्हाला भारतातल्या मेटा व्हेरिफाइड सर्व्हिसचे चार्जेस पाहायला मिळतील. भारतात या सर्व्हिसची किंमत 699 रुपये प्रति महिना असेल. ही किंमत इन्स्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facbeook) या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सारखीच असणार आहे. तर वेब फेसबुकसाठीचं शुल्क 599 असणार आहे.
मेटा व्हेरिफाइड सर्व्हिससाठी 'असा' करा अर्ज
- मेटा व्हेरिफाइड सर्व्हिससाठी तुम्हाला https://about.meta.com/technologies/meta-verified/ पेजवर जाऊन Facebook किंवा Instagram वर क्लिक करावं लागेल.
- याठिकाणी तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात येईल.
- वेटिंग लिस्टमध्ये सहभागी होण्यासाठी जॉइनवर क्लिक करावं.
- तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी तयार होताच तुम्हाला मेलवर त्यासंदर्भातली माहिती मिळेल. तुम्ही पेमेंट करून खातं व्हेरिफाइड करू शकता.
- महत्त्वाची गोष्ट ही की जर तुमचं अकाउंट आधीच व्हेरिफाइड केलं असेल, तर तुम्हाला कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही. ही सर्व्हिस पूर्णपणे फ्री असणार आहे.
ट्विटरपाठोपाठ पेड सबस्क्रिप्शन
ट्विटरचा ताबा एलन मस्क यांनी घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले. तोट्याचा सौदा केल्यानंतर घेतलेले निर्णयही चुकीचे ठरू लागले. ब्लू टिकचा निर्णयही ट्विटरचा चुकला आणि झपाट्यानं उत्पन्नात घट होत गेली. आता ट्विटरच्या पावलावर पाऊल ठेवत फेसबुकनंदेखील आपली व्हेरिफाइडची सेवा सशुल्क केलीय. त्यामुळे त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागणार आहे. मात्र ट्विटरचा अनुभव पाहता फेसबुकची पेड सर्व्हिसही फेल जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. खरं तर ट्विटरची पेड सर्व्हिस देण्यामागची कारणं वेगळी होती. पेड करूनही तोटा कमी न होता तो वाढत गेला. फेसबुकनं मात्र केवळ इतर प्लॅटफॉर्म पेड करतायत म्हणून सर्व्हिस पेड केली. त्यावर भारतात फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी असल्याचंच दिसू शकतं.