Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Baahubali Film Finance Story: बाहुबली चित्रपटासाठी निर्मात्याने 24 टक्के व्याजाने घेतले होते 400 कोटींचे कर्ज

Baahubali Film Finance Story

Image Source : www.keralakaumudi.com

Baahubali Film Making Finance Story : दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या 'बाहुबली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. बाहुबली भाग 1 आणि बाहुबली भाग 2 या दोन्ही चित्रपटांनी मिळून 1000 कोटींहून अधिक व्यवसाय केला. परंतु तुम्हाला माहिती आहे का? निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी बँकेकडून 400 कोटींचे कर्ज घेतले होते, तेही सर्वाधिक 24 % व्याजदराने घेतले होते.

Baahubali Film Actor Rana Daggubati :  बाहुबली चित्रपटात 'भल्लादेव'ची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबाती याने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बाहुबली चित्रपटाबाबत काही खुलासे केले. तो म्हणाला  की, 'तीन-चार वर्षांपूर्वी चित्रपट तयार करण्यास निर्मात्यांकडे पैसा कुठून यायचा? तर निर्माते आपलं घर किंवा त्यांची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून कर्ज घेत असे किंवा बँकेकडून वैयक्तिक कर्ज उचलत असे. बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील 24 % व्याजदराने 400 कोटींचे कर्ज घेऊन चित्रपट तयार केला होता.

बाहुबली 1 करीता  180 कोटीचे कर्ज

बाहुबली भाग -1 करीता निर्मात्यांनी 180 कोटीचे कर्ज घेतले होते. हे कर्ज साडेपाच वर्षाच्या मुदतीवर घेण्यात आलं होतं. या चित्रपटाचा पहिला भाग चित्रीत करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कारण, यासाठी 24 % व्याजदराने कर्ज घेतल्या गेले होते. तेलगूमध्ये सर्वाधिक कलेक्शन केलेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटावर दुप्पट पैसे खर्च करण्यात आले. याच व्याजाच्या पैशामधून निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा काही भागही शूट केला होता. हे सर्व करीत असतांना निर्मात्यांनी चित्रपटाच्या यश-अपयशा बाबत कुठलाही विचार केलेला नव्हता.

चित्रपटाने केला 1000 कोटींचा आकडा पार

2015 मध्ये पडद्यावर झळकलेल्या बाहुबली चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर परदेशातही धडाकेबाज कमाई करत अनेक रोकॉर्डस आपल्या नावावर केले होते. या चित्रपटातील अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबातीची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली होती. बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागाने 500 कोटीच्या जवळपास कमाई केली होती. तर बाहुबली चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने 1300 कोटींच्या जवळपास कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस एस राजामौली यांनी केले होते. आजही हा चित्रपट बघतांना तेवढाच मनोरंजनात्मक वाटतो. हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे.

पुरस्कारांचा धडाका

बाहुबली भाग-1 चित्रपटाने वर्ष 2016 चा फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार (तेलुगू भाषेतील) पटकावला आहे. त्यानंतर 2016 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार (तेलुगू भाषेतील) मिळवला आहे. तर  बाहुबली भाग-2 चित्रपटाने तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले आहे.