Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Battery Plant: मेक इन इंडिया मिशनला 'टाटा'! 'या' देशात इव्ही बॅटरी प्रकल्प उभारणार टाटा कंपनी

TATA Motors

बॅटरी निर्मिती उद्योग भारतामध्ये सुरू केल्यास सरकारकडून प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह (PLI) देण्यात येतात. या योजनेचा अनेक कंपन्यांनी लाभ घेतला आहे. जपानी कंपनी पॅनासॉनिक भारतामध्ये इव्ही बॅटरी निर्मितीमध्ये गुंतवणूक करणार आहे. मात्र, टाटा कंपनी हा प्रकल्प युरोपला घेऊन गेली आहे.

Tata Battery Plant: इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढत असल्याने ऑटो कंपन्यांना हेवी बॅटरीची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. परदेशातून बॅटरी आयात करण्यापेक्षा देशात EV बॅटरी प्रकल्प उभारणीला कंपन्यांकडून पसंती देण्यात येत आहे. दरम्यान, टाटाने मेक इन इंडिया मिशनला टाटा केल्याचं दिसून येत आहे. युरोपातील ब्रिटनमध्ये टाटा कंपनी इव्ही प्रकल्प उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

भारतामध्ये बॅटरी निर्मिती उद्योग सुरू केल्यास सरकारकडून प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह (PLI) देण्यात येतात. या योजनेचा लाभ अनेक कंपन्यांनी घेतला आहे. जपानी कंपनी पॅनासॉनिक भारतामध्ये इव्ही बॅटरी निर्मितीमध्ये गुंतवणूक करणार आहे. मात्र, टाटा कंपनी हा प्रकल्प युरोपला घेऊन गेली आहे. 

जॅग्वार-लँडरोव्हर गाड्यांसाठी बॅटरीचा पुरवठा 

दक्षिण इंग्लडमधील सोमरसेट या ठिकाणी हा प्लांट उभारला जाऊ शकतो. या प्लांटमधून बॅटरीचा पुरवठा केला जाईल. युरोप अमेरिकेत जॅग्वार-लँडरोव्हर या गाड्यांची सर्वाधिक विक्री होते. त्यामुळे बॅटरी पुरवठा तेथून लवकर होऊ शकतो, हे सुद्धा प्रकल्प भारताबाहेर नेण्याचे एक कारण आहे. दरम्यान, कंपनी भारतातील बॅटरीची गरज पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत प्रकल्प सुरू करणार का? हे अद्याप स्पष्ट नाही. 

दरवर्षी सुमारे 5 लाख बॅटरी निर्मिती

टाटा कोठे प्रकल्प उभारणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. ब्रिटन किंवा स्पेन हे दोन पर्याय कंपनीपुढे होते. ब्रिटनमध्ये टाटाच्या या प्लांटमधून 5 लाख बॅटरी तयार होतील. या प्लांटची क्षमता 40 गिगावॅट हावर्स इतकी आहे. मुख्यत: जॅग्वार आणि लँडरोव्हर या इव्ही गाड्यांना बॅटरी पुरवली जाईल. 

बॅटरी निर्मिती प्रकल्पासाठी जगभर स्पर्धा

बॅटरी उद्योग स्थानिक स्तरावर सुरू करण्यासाठी जगभरात स्पर्धा सुरू आहे. भारत ऑटो कंपन्यांसाठी मोठे मार्केट असल्याने देशात अनेक कंपन्यांनी बॅटरी प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. पेट्रोल-डिझेल गाड्या कमी होऊन भविष्यात सर्व प्रकारची वाहने इव्ही असतील. त्यासाठी अनुदान आणि इतर सरकारी सहाय्य कंपन्यांना केले जात आहे. 2070 पर्यंत कार्बन फ्री भारत बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.