मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat). या जोडीचा मोठा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. या जोडीने आत्तापर्यंत टाईम प्लीज,आणि काय हवं, नवा गडी नवं राज्य यासारख्या कलाकृतींना सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा तब्बल दहा वर्षानंतर ही जोडी नाटक रंगमंचावर प्रेक्षकांची मनं जिंकायला येत आहे. त्यांच्या नव्या नाटकाचे नाव आहे, 'जर तरची गोष्ट'.
सध्या सोशल मीडियावर उमेश आणि प्रियाच्या नाटकाची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. सर्वच प्रेक्षकांना त्यांच्या या नाटकाची ओढ लागली आहे. लोक त्यांच्या सोशल पोस्टला नाटक कधी, कुठे आणि केव्हा लागणार आहे, असं विचारताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे खास तुमच्यासाठी आज आम्ही नाटकाचे ठिकाण, तारीख आणि साधारण तिकिटाची किंमत याबद्दलची माहिती घेऊन आलो आहोत. तसेच हे तिकीट कुठून बुक करता येईल, जाणून घेऊयात.
नाटकाचे ठिकाण, तारीख आणि वेळ जाणून घ्या
सोनल प्रोडक्शन निर्मित 'जर तरची गोष्ट' या नाटकामुळे तब्बल दहा वर्षानंतर प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. हे नाटक 5 ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी या नाट्यगृहात दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी प्रेक्षकांना पाहता येणार आहे . तर 6 ऑगस्टला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग पार पडणार आहे.
पुण्यातील पहिला प्रयोग 12 ऑगस्टला बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे. 12 तारखेला हे नाटक रात्री 9:30 वाजता प्रेक्षकांना पाहता येईल. त्यानंतर 15 ऑगस्टला दुपारी 4:30 वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी हे नाटक पाहता येणार आहे. 19 ऑगस्टला दादर येथील शिवाजी नाट्य मंदिरात या नाटकाचा दुपारी 4 वाजता प्रयोग असणार आहे.
तसेच 20 ऑगस्टला दुपारी 4:30 वाजता महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड या ठिकाणी हे नाटक प्रेक्षक पाहू शकतील. 27 ऑगस्टला प्रबोधनकार ठाकरे ऑडिटोरियम, बोरिवली वेस्ट येथे दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी हे नाटक प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
तिकिटाची साधारण किंमत काय?
'जर तरची गोष्ट' या नाटकाच्या तिकिटाची किंमत ही प्रत्येक नाट्यगृहांनुसार वेगवेगळी आहे. मात्र याची किमान तिकीट किंमत 200 रुपयांपासून सुरू होते. नाट्यगृहातल्या सुविधेनुसार तिकिटाचे दर कमी जास्त होऊ शकतात.
तिकीट कसे बुक करता येईल?
तुम्हालाही 'जर तरची गोष्ट' हे नाटक पाहायचे असेल, तर तुम्ही Book My Show या तिकीट बुकिंग करणाऱ्या वेबसाईटला भेट देऊ शकता. किंवा त्यांचे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता.
हे ॲप ओपन केल्यावर सर्च बारवर तुम्हाला 'जर तरची गोष्ट' असे टाईप करावे लागेल. सर्च केल्यानंतर लगेचच तुम्हाला बुकिंग पेजवर नेण्यात येईल.
तुमच्या जवळच्या नाट्यगृहाची निवड करा आणि तुमची सीट सिलेक्ट करा. सीटचे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन Transaction करू शकता.
त्यासाठी यूपीआय,डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करता येईल.
ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमच्या मेल आयडीवर किंवा व्हाट्सअपवर तिकीट बुकिंग झालेला मेसेज पाहायला मिळेल.