लिलावासाठी (Auction) ठेवण्यात आलेली कॅडबरीची चॉकलेट (Cadbury chocolate) ही 121 वर्षे जुनी आहे. त्यानिमित्तानं कॅडबरी ही एवढी जुनी कंपनी असू शकते, याचा अंदाजही बहुतेकांना नाही. या लिलावाच्या माहितीनंतर तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. यामागेही एक खास कारण आहे.
Table of contents [Show]
1902मध्ये केलं होतं तयार
असं सांगितलं जात आहे, की 1902मध्ये एका 9 वर्षांच्या मुलीला कोणीतरी कॅडबरी चॉकलेट खायला दिलं होतं. मात्र मुलीनं ते खाण्याऐवजी तसंच जपून ठेवलं. त्याला आता 121 वर्षे झाली. मेरी एन ब्लॅकमोर यांची नात 72 वर्षीय जीन थॉम्पसन या चॉकलेटचा लिलाव करणार आहेत. हे व्हॅनिला चॉकलेट आमच्या कुटुंबात अनेक दशकांपासून आहे, असं यावेळी जीन थॉम्पसन यांनी सांगितलं.
खाण्याऐवजी जपून ठेवलं
हे चॉकलेट 1902मध्ये इंग्लंडचा राजा एडवर्ड VII आणि राणी अलेक्झांड्रा यांच्या राज्याभिषेकाच्या खास प्रसंगी बनवण्यात आलं होतं. हे एक महागडं चॉकलेट होतं आणि त्यावेळेस सहजासहजी मिळत नसे. त्याचमुळे कदाचित 9 वर्षीय मेरी एन ब्लॅकमोरला जेव्हा हे चॉकलेट खायला देण्यात आलं, तेव्हा तिनं ते खाण्याऐवजी जपून ठेवलं.
हॅन्सन्स इथं होणार लिलाव
डेली मेलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या रिपोर्टनुसार हॅन्सन्स इथं या चॉकलेटचा लिलाव होणार आहे. याला मोठी किंमत मिळण्याची शक्यता आहे. इतिहासाशी निगडीत गोष्टींसाठी अनेक वेळा लोक अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मोजतात, असं अनेकवेळा दिसून आलं आहे. याही बाततीत असंचं होण्याची शक्यता आहे.
An untouched 121-year-old tin of chocolates is to be sold at auction.https://t.co/NKsuHC3env
— Sky News (@SkyNews) July 12, 2023
खाण्यायोग्य नाही, पण...
121 वर्षे जुनं झालेलं हे चॉकलेट कॅडबरी कंपनीचं आहे. व्हॅनिला फ्लेवरमध्ये असलेलं हे चॉकलेट आता एक्सपायर झालं आहे म्हणजेच खाण्यायोग्य नाही. मात्र जुना ठेवा म्हणून याला आता महत्त्व प्राप्त झालं आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये असलेला चॉकलेटचा हा टिन बॉक्स अप्रतिम असाच आहे. त्यावर राजा आणि राणीचा फोटोही बनवला आहे.