Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Navi Mumbai Airport: नवी मुंबईतून विमानांचे टेकऑफ! गौतम अदानी यांनी सांगितली नवी मुंबई एअरपोर्टची डेडलाईन

Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड ताण आहे. हवाई सेवेचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळाची उभारणी केली जात आहे. नवी मुंबईतील पनवेलजवळ विमानतळ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 16700 कोटींचा खर्च होणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई एअरपोर्टवरुन लवकरच विमाने उड्डाणे घेणार आहेत. मुंबई एअरपोर्ट हाताळणाऱ्या अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांनी डिसेंबर 2024 पासून  नवी मुंबई एअरपोर्ट कार्यान्वित होईल, असे म्हटले आहे. आज मंगळवारी 18 जुलै 2023 रोजी झालेल्या अदानी एंटरप्राईसेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

अदानी एंटरप्राईसेसची उपकंपनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जकडून देशातील एअरपोर्ट्स हातळली जातात. नवी मुंबई विमानतळाचा चार टप्प्यात विकास करण्यात येत आहे. यासाठी 1160 एकर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

अदानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले. ते म्हणाले की अदानी समूहाकडील अनेक मोठ्या प्रकल्पांचे प्रगतीपथावर आहेत. त्यातील दोन महत्वाच्या प्रकल्पांच्या कामाची अपडेट्स अदानी यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले की अदानी ग्रुपचे दोन महत्वाचे प्रोजेक्ट्स सध्या सुरु आहेत. त्यातील एक नवी मुंबई विमानतळ आणि दुसरा प्रोजेक्ट कॉपर रिफायनरी असे अदानी यांनी सांगितले. यापैकी नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरु असून डिसेंबर 2024 मध्ये ते कार्यान्वित होईल, असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला.

कॉपर रिफायनरी गुजरातमधील कच्छमध्ये मुंढ्रा बंदराजवळ उभारली जाणार आहे. यासाठी अदानी ग्रुपकडून जवळपास 8000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड ताण आहे. हवाई सेवेचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळाची उभारणी केली जात आहे. नवी मुंबईतील पनवेलजवळ विमानतळ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 16700 कोटींचा खर्च होणार आहे.

नवी मुंबई विमानतळाचे पहिले दोन टप्पे डिसेंबर 2024 अखेर पूर्ण होतील, असे अदानी यांनी सांगितले. भारताचे राष्ट्रीय फूल कमळातून प्रेरणा घेत नवी मुंबई विमानतळाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. अदानी ग्रुप आणि सिडको यांच्या संयुक्त उद्यममधून नवी मुंबई विमानतळ विकसित करण्यात येणार आहे.

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रोच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्यादृष्टीने पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यात येत आहे.

मुंबई एअरपोर्टवरील हवाई सेवेचा भार कमी होणार

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात व्यस्त एअरपोर्टपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मुंबई एअरपोर्टवरुन 2 लाख 80 हजार फ्लाईट्स आगमन आणि प्रस्थान झाले. गेल्या वर्षात मुंबईतून 1 कोटी 12 लाख प्रवाशांनी मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास केला होता. नवी मुंबई विमानतळाची वार्षिक क्षमता 2032 पर्यंत 9 कोटी इतकी वाढेल. ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी नवी मुंबई एक भक्कम पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई विमानतळावरचा हवाई वाहतुकीचा भार नवी मुंबई विमानतळाकडे वळवला जाणार आहे.