Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जपानी तंत्रज्ञानाने भारतीय रोड होणार हायटेक; डोंगराळ भागातील रस्ते बांधण्यासाठी मास्टर प्लॅन

road

Image Source : www.wikipedia.com

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जपान आणि भारतामध्ये सहकार्य करार झाला. JICA ही जपानची रस्ते निर्मिती आणि उवजड उद्योग क्षेत्रातील सरकारी कंपनी आहे. या कंपनीच्या सहकार्याने भारतामध्ये मेट्रोसह इतरही अनेक महत्त्वाचे प्रकल्प याआधी पूर्ण करण्यात आले आहेत.

Road Infrastructure: डोंगराळ भागातील रस्ते निर्मिती हे एक आव्हानात्मक काम असते. उंच-सखल डोंगर, दऱ्या, भुयारी मार्ग निर्माण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, हे आव्हान पेलण्यासाठी आता भारताने जपान इंटरनॅशनल कॉ-ऑपरेशन एजन्सी (JICA) बरोबर सहकार्य करार केला आहे. भारतात रस्ते निर्मिती करताना महत्त्वाची नियमावली तयार केली आहे. त्यानुसारच येत्या काळात रस्ते बांधले जातील. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा सहकार्य करार झाला. JICA ही जपानची रस्ते निर्मिती आणि उवजड उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्या सहकार्याने भारतामध्ये इतरही अनेक प्रकल्प याआधी पूर्ण करण्यात आले आहेत. 

दुर्गम भागतील रस्त्यांवर लक्ष 

जपान सोबत सहकार्य करून भारतातली दुर्गम भागात सर्वाधिक रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरांपासून दूर प्रदेशातही आर्थिक उलाढाली, संपर्कव्यवस्था, पायाभूत सुविधा उभ्या राहतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे. 

रस्ते बांधताना नियमावली काय आहे?

रस्ते बांधताना नियमांद्वारे तांत्रिक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. रस्ता तयार करताना डोंगराचा चढ-उतार किती असावा, उतारापासून रस्त्यांचे संरक्षण कसे करावे, जिओसिंथेसिस, भुयारी मार्गाची निवड, बांधकामाची पद्धत, ड्रेनेज आणि पाण्याची निचरा होण्याची व्यवस्था, रहदारी यासह इतर अनेक तांत्रिक गोष्टींवर नियमातून लक्ष देण्यात आले आहे. 

नवी नियमावली रस्ते विकासात ठरणार गेमचेंजर

यापूर्वी डोंगराळ भागातील रस्ते तयार करताना कोणत्याही खास नियमांचे पालन करण्यात येत नव्हते. मात्र, जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने पाच नियम आखण्यात आले आहेत. त्याचे पालन करून डोंगराळ भागातील रस्ते बांधण्यात येतील. हे रोड परिपूर्ण आणि सक्षम असतील. भौगोलिक प्रदेशातील असे रस्ते मजबूतही हवे असतात. कारण, पावसाळ्यास रस्ते वाहून जाण्याची, दरडी कोसळण्याची आणि भूसख्खलन होण्याची जास्त शक्यता असते. 

उत्तर आणि ईशान्य पूर्वेकडील हिमालयीन रांगा, महाराष्ट्र, कर्नाटकातील पश्चिम घाट, मध्य भारतातील पर्वत रांगा आणि दक्षिणेकडील पाल घाट, अनामलाई, नल्लामल्ला डोंगररांगा सह इतरही अनेक भौगोलिक प्रदेश भारतात आहे. या ठिकाणी रस्ते तयार करण्याचे काम अवघड आहे. अनेक वेळा रस्ते प्रकल्पांना दिरंगाई होते. तसेच तयार रस्ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगले, दीर्घकाळ टिकतील असे रस्ते तयार होऊ शकतात.