Bikaji Foods: बिकाजी फूड्स कंपनीकडून भुजीयालालजी प्राइव्हेट लिमिटेड या कंपनीचे 49 शेअर्स खरेदी करण्यात आले आहेत. या डीलनंतर शेअर बाजारात बिकाजी शेअर्सने 7 टक्क्यांनी उसळी घेतली असून प्रति शेअरचे मूल्य 467 रुपयांवर पोहचले होते.
हल्दीराम आणि बिकाजी या दोन्ही प्रसिद्ध स्नॅक्स कंपन्या एकाच कुटुंबातील असून बाजारपेठ आणि कंपन्या काबीज करण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे. (Bikaji Foods acquires Bhujialalji) मागील वर्षी बिकाजीने आयपीओ लाँच केल्यानंतर काही दिवसांनी हल्दीरामचा IPO आला होता. जगभरातील स्नॅक्स मार्केटमध्ये बिकाजी आणि हल्दीराम कंपन्या पोहचल्या आहेत.
कसा झाला व्यवहार?
भुजीयालालजी ही राजस्थानमधील बिकानेर येथील कंपनी आहे. या कंपनीचे प्रति 10 रुपयांचे 9,608 शेअर्स बिकाजीने खरेदी केले आहेत. सोबतच 396 कम्पलसरी कर्न्वर्टिबल डिबेंन्चर्स (CCDs) 5100 रुपये दराने खरेदी केले आहेत. संपूर्ण व्यवहाराचे मूल्य 5 कोटीं रुपये आहे.
सोर्स - गुगल
भुजीयालालजी ब्रँडला खाली खेचणार नाही
बिकाजी कंपनीने या व्यवहाराची माहिती शेअर बाजार नियामक संस्थेला दिली आहे. भुजीयालालजी ब्रँडचे शेअर्स खरेदी केल्याने कंपनी आणखी प्रगती करेल. अनेक जागतिक कंपन्या याच पद्धतीने प्रतिस्पर्धी कंपन्या ताब्यात घेतात. (Bikaji Foods acquires Bhujialalji) भुजीयालालजी ब्रँडला आम्ही खाली खेचणार नाही. तर आणखी मोठे करू. दोन्ही कंपन्यांचे कामकाज वेगळे राहील. भारतातील प्रत्येक घरात स्नॅक्स पोहचवण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे, असे बिकाजी फूड्स कंपनीचे संचालक दिपक अगरवाल यांनी म्हटले.
भारतात रेडी टू इट आणि रेडी टू मेक फूड्सची विक्री वाढत आहे. स्नॅक्स श्रेणीतील अनेक उत्पादनांची विक्री वाढत असल्याने या सेगमेंटमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र, हल्दीराम, बिकाजी या कंपन्या भुजीया, नमकिन विक्रीत आघाडीवर आहेत. इतरही जागतिक ब्रँड या स्पर्धेत आहेत.
एकाच कुटुंबातून हल्दीराम आणि बिकाजीची सुरुवात
बिकाजी आणि हल्दीराम दोघांची सुरूवात एकाच कुटुंबातून झाली. चार सख्खे भाऊ या दोन्ही कंपन्यांचे मालक आहेत. चार भावांचे आजोबा गंगा बिशन अग्रवाल यांनी 1982 मध्ये मूळ हल्दीराम कंपनीची स्थापना केली होती. सर्वात मोठा भाऊ शिव किशन अग्रवाल, हे नागपूर मुख्यालय असलेल्या हल्दीराम स्नॅक्स चालवतात, जिची पश्चिम आणि दक्षिण भारताच्या मार्केटवर मजबूत पकड आहे. तर दिल्ली मुख्यालय असलेली संस्था- हल्दीराम फुड्स इंटरनॅशनलला मनोहर आणि मधूसुदन अग्रवाल हे दोन भाऊ मिळून चालवतात.