Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI : आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या सात कंपन्यांच्या संपत्तीचा सेबी करणार लिलाव, 13 कोटी कमावण्याचा अंदाज

SEBI

Image Source : www.fortuneindia.com

गुंतवणूकदारांची दिशाभूल करून, त्यांच्याकडून अवैधरीत्या भांडवल जमा केल्याचा आरोप या सात कंपन्यांवर करण्यात आला आहे. या सातही कंपन्यांची सखोल चौकशी केल्यानंतर सेबीने ही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 ऑगस्टला या सात कंपन्यांच्या एकूण 15 मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती स्वतः सेबीने दिली आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे जमा केलेले पैसे वसूल करण्यासाठी सनहेवन ॲग्रो इंडिया ( Sunheaven Agro India) आणि रविकिरण रियल्टी इंडियासह (Ravikiran Realty India) इतर सात कंपन्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. होय, ज्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची दिशाभूल करून नफा कमावला आणि आर्थिक गैरव्यवहार केला असेल अशा कंपन्यांच्या बाबतीत सेबी असा कठोर निर्णय घेऊ शकते. येत्या 21 ऑगस्टला या सात कंपन्यांच्या एकूण 15 मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती स्वतः सेबीने दिली आहे.

या आहेत कंपन्या!

सेबीने मंगळवारी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गुंतवणूकदारांची दिशाभूल करून, त्यांच्याकडून अवैधरीत्या भांडवल जमा केल्याचा आरोप या सात कंपन्यांवर करण्यात आला आहे. या सातही कंपन्यांची सखोल चौकशी केल्यानंतर सेबीने ही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, इन्फोकेअर इन्फ्रा (Infocare Infra), भारत कृषी समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड (Bharat Krishi Samrudhhi Limited), जीएसएचपी रियलटेक लिमिटेड (GSHP Realtech Limited), जस्ट-रिलायबल प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड (Just Reliable Projects India) आणि न्यूलँड ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड (Newland Agro Industries Ltd) यांच्या काही मालमत्तांचाही लिलाव होणार आहे.

इतक्या कोटींचा होणार लिलाव!

वरील सात कंपन्यांच्या मालमत्तांच्या लिलावासाठी सेबीकडून 13 कोटी रुपयांची राखीव किंमत ठेवण्यात आली आहे. या साठी कंपन्यांच्या संपत्ती वेगवगेळ्या स्वरूपात आहेत. काही कंपन्यांच्या निवासी इमारती जप्त केल्या गेल्या आहेत तर काहींच्या जमिनी. सेबीने दिलेल्या माहितीनुसार येत्या 21 ऑगस्टला या मालमत्तांचा ऑनलाइन लिलाव केला जाईल. ज्या नागरिकांना यात बोली लावायची असेल त्यांनी लिलावात निघालेल्या या संपत्तीची माहिती घ्यावी आणि बोली लावावी असे सेबीने म्हटले आहे. सेबीच्या अधिकृत वेबसाईटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.