Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Indian Startups: गेल्या आर्थिक वर्षात स्टार्टअपची भरभराट, 1.4 अब्ज डॉलर्सची झाली गुंतवणूक

एका अहवालानुसार जानेवारी 2023 मध्ये 734 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक नोंदवली गेली होती. मार्च 2023 मध्ये मात्र 1.4 अब्ज डॉलर्सने गुंतवणूक वाढली होती. दिवसेंदिवस स्टार्टअपमधील ही वाढत जाणारी ही गुंतवणूक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची ठरणार आहे.

Read More

McDonald’s layoff : आता मॅकडोनाल्ड्स कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड, आठवडाभरात यूएसमधली कार्यालयं करणार तात्पुरती बंद

McDonald’s layoff : मॅकडोनाल्ड कॉर्प या आठवड्यात आपली अमेरिकेतली (United States) आपली कार्यालयं तात्पुरती बंद करत आहे. मॅकडोनाल्ड एक मोठी बर्गर चेन आहे. मात्र या कंपनीलादेखील ले ऑफचं ग्रहण लागलंय. या आठवड्यात कंपनी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालयं बंद ठेवणार आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलनं (The Wall Street Journal) यासंबंधीचा अहवाल दिलाय.

Read More

UBS-Credit Suisse Merger: डबघाईतील क्रेडिट स्वीस विलीनीकरणाने वाचणार पण 36 हजार कर्मचारी नोकरी गमावणार

UBS-Credit Suisse Merger: आर्थिक डबघाईला आलेल्या क्रेडिट स्वीस बँकेचे UBS बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने घेतला.यामुळे क्रेडिट स्वीस तारणार असली तरी या दोन्ही बँकांच्या जगभरातील जवळपास 36 हजार कर्मचाऱ्यांना मात्र नोकरी गमवावी लागेल, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्वित्झर्लंडमधील किमान 11000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

Read More

Investment for Special Child: दिव्यांग मुलाच्या भविष्याची चिंता सतावतेय; आर्थिक घडी बसवण्यासाठी पालकांनी काय करावं?

आज (2 April) वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे (World Autism Day) आहे. दिव्यांग मूल घरात असणं पालकांसाठी हे एक मोठं आव्हान असते. पाल्याची काळजी घेण्यासाठी सतत कोणीतरी लागते. तसेच उपचार, औषधे आणि मानसिक त्रास यामध्ये संपूर्ण कुटुंब होरपळून निघते. मात्र, योग्य नियोजन केलं तर ही परिस्थिती तुम्ही खंबीरपणे निभावून नेऊ शकता. तुमच्या अनुपस्थितितही पाल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी हा लेख वाचा.

Read More

Dunzo : डंझो उभा करणार 5 कोटी अमेरिकन डॉलर निधी

Dunzo Investment : देशातल्या 8 शहरांमध्ये डिलिव्हरी सर्व्हिस देणारी डंझो ही स्टार्ट-अप कंपनीने नवीन गुंतवणूक फेरी सुरू केल्याचे चर्चेत आहे. डंझो आता आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून 5 कोटी अमेरिकन डॉलर एवढा निधी उभा करणार आहे.

Read More

GST cess on pan masala and tobacco : पान मसाला, तंबाखू उत्पादनांवरचा जीएसटी सेस निश्चित; अधिसूचना जारी

GST cess on pan masala and tobacco : सरकारनं पान मसाला, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर GST भरपाई दर निश्चित केला. वित्त विधेयक 2023मध्ये यासंबंधीचा नियम समाविष्ट केलाय. आता यासंदर्भात अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आलीय. यासोबतच सरकारनं कमाल दर किरकोळ विक्री किंमतीशी जोडलाय. नवीन दर 1 एप्रिल 2023पासून लागू झालाय.

Read More

GST : GST संकलनात 13% वाढ, 1.60 लाख कोटींहून रक्कम जमा

GST Collection : जीएसटी म्हणजे संपूर्ण देशासाठी लागू असलेला एक अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर एकाच प्रकारचा आकारला जाणारा कर आहे. आज 1 एप्रिल पासुन नविन आर्थिक वर्षाची सुरुवात झालेली आहे. तेव्हा आज आपण आर्थिक वर्ष 2022 ते 2023 दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकुण किती जीएसटी कर संकलित झाला आहे, हे जाणून घेऊया.

Read More

BS6 Norms: BS6 चा दुसरा टप्पा आजपासून लागू; टू-व्हीलर, कार किती महाग होतील?

वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली दिवसेंदिवस कठोर करण्यात येत आहे. BS म्हणजेच भारत स्टेज नियमावली सर्वप्रथम 2020 पासून लागू झाल्यानंतर वाहनांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. आता BS6 नियमावलीचा दुसरा टप्पा आजपासून लागू झाला आहे. (BS6 phase 2 emission Norms) याचा परिणाम वाहन निर्मिती कंपन्यांवर जसा होईल तसाच तो सर्वसामान्य ग्राहकांवर देखील होईल.

Read More

Online Gaming: ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या बक्षिसांवर द्यावा लागेल इतका TDS

यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून ऑनलाइन गेमिंगच्या प्रत्येक कमाईवर 30 टक्के TDS कापला जाणार आहे. याआधी TDS चे वेगळे नियम होते. 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक पैशांचे बक्षीस मिळवल्यावर त्यावर कर लावला जात होता.

Read More

Ather Electric scooter Sales: अथर कंपनीने एकाच महिन्यात विकल्या 1,754 इलेक्ट्रिक स्कुटर्स

Electric scooter : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे वळले आहे. एथर (Ather) या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. एथर एनर्जीने मार्च महिन्यात एकूण 11,754 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. तसेच, 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 82,146 ईव्ही वाहनांची विक्री केली.

Read More

Power Bill Hike: महाराष्ट्रात आजपासून वीज दरवाढ लागू

वीज दरवाढ दर पाच वर्षांनी होत असताना, तीनच वर्षात ही दरवाढ का केली गेली आहे हा अनेकांना प्रश्न पडला आहे. कोविड काळात अनेकांची वीज बिलं माफ केल्यामुळे वीज वितरक कंपन्या तोट्यात होत्या. वीज नियामक मंडळाला भाववाढ करण्याची त्यांनी मागणी देखील केली होती.

Read More

Cryptocurrency : क्रिप्टो करन्सीला आता लागू होणार मनी लाँडरिंग कायदा

Crypto Currency under Money Laundering Law : व्हर्च्युअल डिजीटल अॅसेट मधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने Crypto Currency ला मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More