Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment for Special Child: दिव्यांग मुलाच्या भविष्याची चिंता सतावतेय; आर्थिक घडी बसवण्यासाठी पालकांनी काय करावं?

World Autism Awareness Day

आज (2 April) वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे (World Autism Day) आहे. दिव्यांग मूल घरात असणं पालकांसाठी हे एक मोठं आव्हान असते. पाल्याची काळजी घेण्यासाठी सतत कोणीतरी लागते. तसेच उपचार, औषधे आणि मानसिक त्रास यामध्ये संपूर्ण कुटुंब होरपळून निघते. मात्र, योग्य नियोजन केलं तर ही परिस्थिती तुम्ही खंबीरपणे निभावून नेऊ शकता. तुमच्या अनुपस्थितितही पाल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी हा लेख वाचा.

World Autism Day: आज 2 एप्रिल जागतिक ऑटिझम दिवस आहे. मूल स्वत: मध्ये गुंतून राहणारं, आत्मकेंद्रित वृत्तीचं असणं हे या आजाराचे एक लक्षण आहे. अशी मुलं सर्वसामान्य मुलांसारखी नसतात. अशी मुलं गतीमंद, मतीमंद देखील असतात. परिसराशी, आजूबाजूच्या लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. सोबतच इतरही अनेक लक्षणे या आजाराची आहेत. 

अशी मुलं स्वत:च्या पायावर उभं राहू शकत नाहीत. सोबतच दिव्यांग मूल जन्माला येणं हा पालकांवर मोठा मानसिक आघात असतो. कारण, आपल्यानंतर आपल्या दिव्यांग मुलांच काय? त्याला तर कमावता येत नाही? ही चिंता पालकांना पडलेली असते. भारतामध्ये 1 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त मुले दिव्यांग आहेत. 

मूल ऑटिझमने ग्रासलेलं किंवा दिव्यांग असणं ही गोष्ट पचवणे पालकांना अवघड जाते. तसेच अपघात किंवा इतर काही गोष्टींमुळेही मूल आयुष्यभरासाठी अंथरुणाला खिळून राहू शकतं. (World Autism Awareness Day) जीवनात अनेक प्रकारच्या आणीबाणी येतात. त्यापैकीच ही एक. स्पेशली एबल्ड म्हणजेच दिव्यांग मूल घरात असल्यामुळे त्याच्या आई वडीलांना स्वत:च्या करिअरवरदेखील लक्ष देता येत नाही. तसेच उपचार आणि देखभाल यामध्ये मोठा खर्च होऊन आर्थिक चणचणही निर्माण होऊ शकते. अशा दिव्यांग मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी पालक काय करू शकतात हे आपण या लेखात पाहू. जागतिक ऑटिझम दिवसाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये जगजागृती करूया. 

दिव्यांग मूल घरात असणं म्हणजे पालकांना एकाच नाही तर दोन पिढ्यांसाठी आर्थिक व्यवस्था करावी लागते. (World Autism Awareness Day) एक तर त्यांच्या स्वत:च्या निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे नियोजन, आर्थिक निर्णय आणि सोबतच त्यांच्या अनुपस्थितीत दिव्यांग मुलासाठी आर्थिक तरतूद.

head-image-2.jpg

पालकांचे आर्थिक गणित

घरामध्ये दिव्यांग मूल असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी कोणीतरी कायम बरोबर हवे असते. एकतर आई-वडीलांपैकी एकाला घरी थांबावे लागते (Investment for Special Child) किंवा मुलाची काळजी घेण्यासाठी मदतनीस ठेवावा लागतो.  त्यासाठी मासिक खर्चही होतो. सोबतच मुलाचे ट्रिटमेंट, औषधे, दिव्यांग मुलांसाठीचे खास व्होकेशनल शिक्षण यासाठी अतिरिक्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे पालकांच्या उत्पन्नातला बराच भाग खर्च होऊन गुंतवणूक आणि सेव्हिंगसाठी कमी पैसे शिल्लक राहतात. 

मूल दिव्यांग किंवा ऑटिझम आजाराला बळी पडलेले असेल तर अशा परिस्थितीत पालकांनी लगेच भविष्याच्या नियोजनाला लागायला हवे. मुलाला असणारा आजार, त्याच्या भविष्यातील गरजा, तुमच्या अनुपस्थितीत उत्पन्नाचे स्रोत याचे नियोजन करावे. दिव्यांग मुलाच्या उपचाराचा खर्च, शिक्षण, निवास यासाठीही तरतूद करावी लागेल. अशा परिस्थितीत गुंतवणूक करताना पालकांना थोडी जास्त जोखीम घ्यावी लागू शकते. कारण खर्च जास्त असल्यामुळे वाढत्या महागाईतही परतावा चांगला मिळण्यासाठी जोखीम जास्त घ्यावी लागेल.

आर्थिक नियोजन (Investment Plan for Special Child)

1) पाल्याचा महिन्याचा खर्च किती याचा अंदाज काढा

2) दिव्यांग मुलाचे आयुष्यमान आणि महागाई विचारात घेऊन अंदाजित रक्कम ठरवा.

3) गुंतवणुकीचे पर्याय कोणते ते पाहा. 

4) मुलाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजांनुसार गुंतवणुकीचे ध्येय ठरवा.

5) पालकांच्या मृत्यूनंतर मुलाला कोणती संपत्ती मागे सोडून जाणार आहोत, हे पाहा. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मुलाला खर्च भागवता येईल का याचा विचार करा. मूल निर्णय घेऊ शकणारे नसेल तर संपत्तीबाबतचे निर्णय कोण घेणार ते आधीच ठरवा. 

6) पालकांच्या मृत्यूनंतर नातेवाईक, कुटुंबातील इतर कोणते सदस्य दिव्यांग मुलाची काळजी घेऊ शकतात हे पाहा. कायदेशीरपणे तुम्ही कुटुंबातील किंवा नातेवाईकांची निवड करू शकता. 

head-image-2.jpg

पाल्याला कौशल्य शिकवण्यावर भर द्या

अशी अनेक दिव्यांग मुलं तुम्ही पाहिली असतील ज्यांनी शारीरिक अडथळ्यांवर मात करतही यश संपादन केले आहे. तुमच्या मुलाच्या क्षमतेनुसार त्याला जीवनात उपयोगी पडतील अशी कौशल्ये शिकवा. उदाहरणार्थ, व्हाईस ओव्हर, पेंटिग, आर्ट अशी कौशल्य मूल आत्मसात करू शकते. अर्थात, त्याला असणारा आजार, शारीरिक स्थितीनुकरू हे बदलेल. (Investment for Special Child) मूल काहीच करू शकत नसेल तर मग दैनंदिन जीवन जगताना जी कौशल्ये गरजेची आहेत, ते शिकवणे फायद्याचे ठरेल. स्वमग्न, दिव्यांग मुलांवर काम करणाऱ्या अनेक सामाजिक आणि सरकारी संस्था आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्यातून तुम्हाला मुलाच्या भविष्याचे नियोजन करण्यासाठी योग्य माहिती मिळेल.

आरोग्य विमा महत्त्वाचा

घरामध्ये दिव्यांग मूल असाताना आधीच आरोग्यवरील खर्च जास्त असू शकतो. अशा परिस्थिती कुटुंबातील  सर्व सदस्यांचा पुरेसा आरोग्य विमा अत्यावश्यक आहे. पालकांनी स्वत:चा जीवन विमाही काढून घ्यावा. वार्षिक उत्पन्नाच्या दहापट जीवन विम्याची रक्कम असावी. तुमच्या मृत्यूनंतर ही रक्कम दिव्यांग मुलाच्या चरितार्थासाठी कामाला येईल. ज्या विमा पॉलिसीद्वारे अन्युइटी पेमेंट म्हणजेच परतावा मिळतो, अशा योजनाही फायद्याच्या ठरतील.  

एमर्जन्सी फंड

दिव्यांग किंवा स्वमग्न बालक घरात असेल तर आणीबाणीसाठी निधीची तरतूद आधीच करून ठेवायला हवी. बऱ्याच वेळा दिव्यांग मुलाच्या उपचारासाठी अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो. अशा वेळी बँकेतील मुदत ठेवी किंवा लिक्विड फंडमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. गरजेच्या वेळी लगेच पैसे काढता येतील, अशा पर्यायांमध्ये एमर्जन्सी फंडचा निधी ठेवला पाहिजे.

सेक्शन 80DD

दिव्यांग मुलाचे पालक उपचारावरील खर्चावर करवजावट मिळवू शकतात. 1 लाख 25 हजार रुपये उत्पन्नावर पालक करवजावट मिळवू शकतात. उपचार, औषधे, दिव्यांग मुलाची काळजी घेण्यासाठी केलेल्या खर्चावर ही वजावट मिळवता येईल.