Former CEO of NITI Aayog Amitabh Kant : अमिताभ कांत हे सध्या भारताचे G20 शेर्पा आहेत. G20 किंवा ग्रुप ऑफ ट्वेंटी हा एक मंच आहे, जिथे औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचे धोरणकर्ते जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेटतात. G20 देशांचा जागतिक GDP च्या 85%, जागतिक व्यापारात 75% आणि जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश वाटा आहे.
Table of contents [Show]
भारताकडे आहे जगाची दिशा बदलण्याची ताकत
'G-20 चे अध्यक्ष झाल्यानंतर भारताकडे जगाची स्थिती आणि दिशा बदलण्याची ताकत आहे, हे सिध्द झालं आहे. तसेच भविष्यात किंवा नजीकच्या काळात अमेरिका आणि ब्रिटन सारख्या विकसित अर्थव्यवस्था असलेले देश आर्थिक मंदीच्या कचाट्यात येऊ शकतात, तर उदयोन्मुख अर्थव्यवस्था वेगाने वाढतील', असे मत अमिताभ कांत यांनी स्पष्ट केले.
उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थेला कशी होईल मदत
'विकसित देशांची संसाधने विकसनशील देशांकडे पाठवली पाहिजेत, जेणेकरून उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल. G20 देशांचा जागतिक GDP मध्ये 85 टक्के वाटा आहे, सोबतच 75 टक्के जागतिक व्यापार G 20 देशांमधून केला जातो, जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रुप 20 देशांमध्ये राहते.'
आर्थिक मंदीमुळे येणार अनेक देश संकटात
'आर्थिक मंदीमुळे जगातील 75 देशांना मोठा फटका बसणार आहे. अनेक देश कर्जबाजारीपणामुळे दिवाळखोर होऊ शकतात. आर्थिक मंदीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात आणि करोडो लोक दारिद्र्यरेषेखाली जाऊ शकतात', असे मत जगासमोरील आव्हानांबाबत अमिताभ कांत यांनी स्पष्ट केले.
स्पष्ट केली भारताची G 20 बाबत भूमिका
'ग्रुप 20 देश त्यांच्या जीडीपी वाढीसाठी कटिबद्ध आहेत आणि त्यासाठी ते विविध मार्गांनी काम करत आहेत. भारत मिळलेल्या संधीचे सोने करीत आहे आणि भारताकडे परिस्थिती बदलण्याची क्षमता आहे, असे मत G 20 देशांच्या रणनीतीबद्दल अमिताभ कांत यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षपदाच्या माध्यमातून आम्ही संधीचे सोने करु
'जगात सुरु असलेल्या आर्थिक आणि विविधांगी सर्व समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी G-20 देशांनी जलद कृती करण्याची गरज आहे. जेव्हा G-20 कारवाई करते, तेव्हा ती बहुपक्षीय संस्थेप्रमाणे केली जाते, त्यामुळे भारत जगाला मदत करू शकतो. G-20 च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून आम्ही संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करु', असे G 20 देशांच्या रणनीतीबद्दल अमिताभ कांत म्हणाले.