Petrol-Diesel Price Hike : गेल्या वर्षभरापासुन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. मात्र सद्यस्थितीत सुरु असलेल्या अनेक घटनांमुळे लवकरच याही दोन्ही वस्तुंचे दर वाढू शकतात.
Table of contents [Show]
अनेक देशांनी केली उत्पादन कपातीची घोषणा
सौदी अरेबियासह अनेक कच्च्या तेलाचे प्रमुख तेल उत्पादक असलेल्या देशांनी दररोज दहा लाख बॅरलपेक्षा जास्त उत्पादन कपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे आज (सोमवारी) सुरुवातीलाच कच्च्या तेलाच्या किमती एकाच झटक्यात सहा टक्क्यांनी उसळल्या. ज्या देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली आहे. त्यामध्ये अल्जेरिया, ओमान, कुवेत, यूएई, इराक तसेच सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. आणि महत्वाचे म्हणजे ही कपात पुढील महिन्यापासुन सुरु होऊ सकते आणि वर्षाच्या शेवट पर्यंत राहु शकते.
ओपेक प्लस देशांची काय आहे भूमिका
ओपेक प्लस देशांनी OPEC Plus (OPEC+) देशांनी दररोज 2 दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली होती. रशियानेही प्रतिदिन 50,000 बॅरल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली आहे. 2016 मध्ये, OPEC+ ची निर्मिती करण्यासाठी OPEC ने इतर तेल-उत्पादक राष्ट्रांसोबत युती केली. OPEC+ मध्ये आता 10 देशांमध्ये रशिया, कझाकस्तान, अझरबैजान, मेक्सिको आणि ओमान यांचा समावेश आहे. OPEC+ तयार करण्याचे पाऊल हे 2011 मध्ये उचलल्या गेले. यूएस शेल ऑइल उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींना प्रतिसाद मिळाला होता.
काय आहे आजचे बॅरलचे दर
वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कॉन्ट्रॅक्ट (WTI) 5.74 टक्क्यांनी वाढून 80.01 डॉलर प्रति बॅरल, तर ब्रेंट 5.67 टक्क्यांनी वाढून 84.42 डॉलर प्रति बॅरल झाला.
केंद्रीय बँकांवर वाढू शकतो व्याज वाढीचा दबाव
कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या अनेक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्याने महागाई वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे केंद्रीय बँकांवर व्याज वाढवण्याचा दबावही वाढू शकतो. भारतातील तेल विपणन कंपन्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल केला होता. मे महिन्यात केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले.
रशियाने युक्रेन युध्दाचा परिणाम
गेल्या वर्षी, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 139 वर पोहोचल्या होत्या. या किमतींनी 2008 नंतरची गाठलेली सर्वोच्च पातळी आहे. गेल्या महिन्यात कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली होती. हि किंमत 15 महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, उत्पादनात कपात करण्याच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 10 डॉलरपर्यंत वाढू शकतात.
अमेरिकेची काय आहे भूमिका
अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी जगात कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याची गरज असल्याचे मत अमेरिकेने मांडले होते. यामुळे रशियाच्या कमाईवरही परिणाम होईल आणि युक्रेन युद्धासाठी निधी मिळणार नाही. पण ओपेक प्लस देशांनी अमेरिकेच्या याचिकेकडे दुर्लक्ष केले.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सामान्यांच्या खिशावर
दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये आहे.