भारतीय रिझर्व्ह बँक ( RBI ) ने नीरज निगम यांची कार्यकारी संचालक (RBI Executive Director) म्हणून नियुक्ती केली आहे. RBI चे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी निगम हे आरबीआयच्या भोपाळमधील विभागीय कार्यालयात विभागीय संचालक म्हणून काम बघत होते. येणाऱ्या काळात नीरज निगम यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असणार आहे.
नीरज निगमने गे गेल्या तीन दशकांहून अधिक बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे. येणाऱ्या काळात ग्राहक साक्षरता व संरक्षण, वित्तसंबंधी धोरणे, विविध विभागांच्या विकासाशी निगडित कार्ये, विधी विषयक धोरण आणि सचिवस्तरीय कामकाज सांभाळणार आहेत.
Just In | Neeraj Nigam appointed as RBI's new Executive Director (From Agencies)#RBI @RBI #NeerajNigam pic.twitter.com/xVoONnrRzt
— ET NOW (@ETNOWlive) April 3, 2023
नीरज निगम यांना प्रशासकीय कामाचा देखील दीर्घकालीन अनुभव आहे. याआधी त्यांनी पर्यवेक्षण विभाग, मानव संसाधन व्यवस्थापन, चलन व्यवस्थापन, बँक खाती आणि रिझर्व्ह बँकेतील इतर क्षेत्रांमध्ये काम केले आहे.
नीरज निगम यांनी भोपाळ, मध्य प्रदेश येथील बरकतुल्ला विद्यापीठ (Barkatullah University, Bhopal) येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर (BE Civil) पदवी प्राप्त केली असून त्याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (CAIIB) प्रमाणित CA पात्रता देखील प्राप्त केली आहे.
आव्हानात्मक कार्यकाळात जबाबदारी!
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिरता आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) समोर अनेक आव्हाने आहेत. चलनवाढीचे व्यवस्थापन करणे हे प्रमुख आव्हान आरबीआय समोर असणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात नीरज निकम यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. आरबीआयने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आर्थिक विकासाला बाधा येणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गव्हर्नर शक्तीकांत दास, अर्थमंत्री, वित्त विभागांचे सचिव आणि इतर लोकांसोबत धोरण आखणीसाठी निगम यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.