Fund Raising in Dunzo Start-up : Metro सिटीमध्ये घरपोच वस्तु पोहोचवणारी (Delivery Company) Dunzo ही कंपनी आता पुन्हा एकदा नव्याने निधी (Fund) उभा करणार आहे. गूगल, रिलायन्स रिटेल या त्यांच्या विद्यमान गुंतवणूकदारांकडूनच ते 5 कोटीचा (अमेरिकन डॉलर) निधी उभा करणार आहे. यासंबंधित त्यांची सर्व गुंतवणूकदारांसोबत चर्चा सुरू आहे.
Table of contents [Show]
डंझोची सुरूवात
कबीर बिश्वास, अंकुर अग्रवाल, दलवीर सुरी आणि मुकुंद झा या चार जणांनी 2014 साली बँगलोर येथून डंझो या स्टार्ट-अप कंपनीला सुरूवात केली. ग्रोसरी, भाजीपाला, डब्बे असो वा आपण ऑफिसला गेलो आणि घरी एखादी महत्त्वाची फाईल विसरलो असू तरी ते ही आपण सांगू त्या ठिकाणी पोहोचविण्याची सुविधा ही कंपनी आपल्याला उपलब्ध करुन देते. त्यामुळे सुरूवातीला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरू झालेल्या या कंपनीला अल्पावधीतच स्वत:चे अॅप तयार करावे आणि कंपनीच्या कामाचा आवाका वाढत गेला. या कंपनीकडून विविध स्वरूपाच्या सुविधा कमी किंमतीमध्ये आणि जलग गतीने पुरविल्या गेल्यामुळे या कंपनीची लोकप्रियताही दिवसेगणिक वाढत आहे.
डंझोचे गुंतवणूकदार
डंझोचे एकुण 35 गुंतवणूकदार असून आत्तापर्यंत त्यांनी 18 फंड राउंड्सच्या (Fund Rounds) च्या माध्यमातून निधी उभा केला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनी ब्लॅकसॉइल कडून 50 लाखांचे भांडवली कर्ज घेतले आहे. गूगल, रिलायन्स रिटेल, ब्लॅकसॉइल, क्रिस्टल अॅडव्हायजर्स, लाइटबॉक्स, लाइटरॉक, अलटेरिया कॅपिटल, 3 एल कॅपिटल (3L Capital) आदी कंपन्या या डंझोचे गुंतवणूकदार आहेत.
डंझोला ग्राहकांची पसंती
मेट्रो सिटीमध्ये डंझोच्या या सुविधेला चांगली पसंती मिळत आहे. तुम्ही छोट्यातली छोटी वस्तू जरी घरी विसरला असाल तरी डंझो अॅपवरून तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जाते. एखाद्या ठिकणाहून कागदपत्रे घेऊन त्यांचे फोटोकॉपीज काढुन ती फाईल तुम्हाला हवी असेल तर ते ही डंझो मार्फेत केले जाते. तसेच घरातील ग्रोसरी व अन्य बाजारातील वस्तू ही डंझो करून पोहोचवले जाते.
नोकरकपात
चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या या स्टार्ट-अपलाही अन्य कंपन्यासारखी नोकर कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे. जानेवारी महिन्यामध्ये या कंपनीने आपल्या एकुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार 3 टक्के नोकरकपात केली आहे. मनीकंट्रोल या संकेतस्थळाच्या बातमीनुसार कंपनीच्या पूर्नबांधणीसाठी कंपनीमध्ये काही बदल करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून ही नोकर कपात केल्याचे कंपनीचे कार्यकारी संस्थापक कबीर बिश्वास यांनी सांगितले आहे.
Source: https://bit.ly/42ZqN4k