Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UBS-Credit Suisse Merger: डबघाईतील क्रेडिट स्वीस विलीनीकरणाने वाचणार पण 36 हजार कर्मचारी नोकरी गमावणार

UBS - Credit Suisse merger

UBS-Credit Suisse Merger: आर्थिक डबघाईला आलेल्या क्रेडिट स्वीस बँकेचे UBS बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने घेतला.यामुळे क्रेडिट स्वीस तारणार असली तरी या दोन्ही बँकांच्या जगभरातील जवळपास 36 हजार कर्मचाऱ्यांना मात्र नोकरी गमवावी लागेल, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्वित्झर्लंडमधील किमान 11000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

आर्थिक डबघाईला आलेल्या क्रेडिट स्वीस बँकेचे UBS बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने घेतला. यामुळे क्रेडिट स्वीस तारणार असली तरी या दोन्ही बँकांच्या जगभरातील जवळपास 36 हजार कर्मचाऱ्यांना मात्र नोकरी गमवावी लागेल, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्वित्झर्लंडमधील किमान 11000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

UBS बँक क्रेडिट स्वीसला 3.25 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या विशेष समितीने यासंदर्भात यूबीएस ग्रुपला निर्देश दिले. क्रेडिट स्वीस ही यूबीएस बँकेत विलीन होणार असल्याने बँकिंग क्षेत्रावरचे आर्थिक संकट तूर्त टळले आहे.क्रेडिट स्वीसच्या अधिग्रहणाची प्रोसेस यूबीएसकडून सुरु करण्यात आली आहे. यूबीएसने माजी सीईओ सेर्गोइ इर्मोटी यांच्यावर क्रेडिट स्वीसच्या विलीनीकरणाची जबाबदारी सोपवली आहे.या मेगा मर्जरवर यूबीएसचे अध्यक्ष कोल्म केल्हेर यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दोन्ही बँकांचे एकत्रीकरण करण्यात मोठी जोखीम आहे. (UBS - Credit Suisse merger will hit 36000 jobs in worldwide)

दोन्ही बँकांच्या एकत्रीकरणानंतर ही स्वित्झर्लंडमधील दुसरी मोठी बँक म्हणून निर्माण होईल. क्रेडिट स्वीस-यूबीएस बँकेचे एकूण मनुष्यबळ 122000 हून अधिक असेल. मात्र नोकर कपात करण्याचे संकेत यूबीएसच्या व्यवस्थापनानने दिले आहे. लवकरच 20% ते 30% कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाण्याची शक्यता आहे.  

मार्च महिन्यात अमेरिका आणि युरोपात बड्या बँका आर्थिक अडचणीत सापडल्या होत्या. 15 मार्च रोजी क्रेडिट स्वीस बँकेने आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याचे जाहीर केल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. त्याआधीच्या आठवड्यात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँका बंद झाल्या होत्या.स्वित्झर्लंड सरकारच्या निर्देशानंतर यूबीएसने क्रेडिट स्वीसचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता विलीनीकरणाची प्रोसेस सुरु करण्यात आली आहे.

क्रेडिट स्वीस आर्थिक डबघाईला येण्यापूर्वी अनेक घोटाळ्यांनी बदनाम झालेली आहे. मागील दशभरात क्रेडिट स्वीसमध्ये अनेक छोटे मोठे आर्थिक घोटाळे, स्कॅंडल्स घडली. यातून बँकेला मोठा आर्थिक फटका बसला. शिवाय क्रेडिट स्वीसची प्रतिमा मलीन झाली होती. शेअर मार्केटमध्ये क्रेडिट स्वीसचा शेअर रसातळाला गेला होता. आता स्वीस सरकारच्या आदेशाने यूबीएसमध्ये क्रेडिट स्वीसचे विलीनकरण होणार असले तरी क्रेडिट स्वीसच्या पार्श्वभूमीचा यूबीएस ग्रुपने धसका घेतला आहे.

क्रेडिट स्वीस आणि UBS कडे किती मनुष्यबळ

क्रेडिट स्वीस आणि UBS या दोन्ही बँकांचा जगभर विस्तार आहे. त्यामुळे दोन्ही बँकांकडे सध्या प्रचंड मनुष्यबळ आहे. मिडिया रिपोर्टनुसार क्रेडिट स्वीसकडे 72000 हून अधिक कर्मचारी आहेत. UBS चे जगभरात 50000 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा लाखो डॉलर्स खर्च होत आहेत.क्रेडिट स्वीसचे UBS मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर हा खर्च प्रचंड प्रमाणात वाढेल.विलीनीकरणानंतर खर्च कपात आणि काटकसरीच्या दृष्टीने मनुष्यबळात किमान 20% ते 30% दरम्यान कर्मचारी कपात केली जाईल, अशी चर्चा सध्या स्वित्झर्लंडमधील बँकिंग वर्तुळात आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात झाली तर जगभरातील दोन्ही बँकांचे मिळून जास्तीत जास्त 36000 कर्मचारी बेरोजगार होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.  

(News Source : AFP, ET)