Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tesla Giga Bier : एलन मस्क आता पाजणार बिअर! घोषणा होताच शेअर बाजारात उसळी, किंमत माहितीय?

Tesla Giga Bier : एलन मस्क आता पाजणार बिअर! घोषणा होताच शेअर बाजारात उसळी, किंमत माहितीय?

Tesla Giga Bier : टेस्लाचे एलन मस्क यांनी नुकतीच बिअर लॉन्च केलीय. गिगा बिअर म्हणून टेस्लानं आता अल्कोहोलच्या जगात प्रवेश केलाय. एलन मस्क यांनी टेस्लाकीला अंतर्गत गिगाबियरची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या टेस्ला या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.

अमेरिकी स्टॉक एक्स्चेंज नॅस्डॅकवर (National Association of Securities Dealers Automated Quotations) टेस्लाचे शेअर्स 6.24 टक्क्यांहून अधिक तेजीत असल्याचं दिसून आलं. विविध क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या करणाऱ्या एलन मस्क (Elon Musk) यांनी आणखी एका उद्योगात उडी घेतली आहे. बिअरच्या व्यवसायात त्यांनी प्रवेश केलाय. स्पेस एक्स (SpaceX), टेस्ला (Tesla), ट्विटर (Twitter)... यानंतर आता गिगाबिअर (Gigabier) लॉन्च करण्यात आलीय. दिग्गज उद्योगपती आणि जगातल्या अव्वल अब्जाधीशांपैकी एक असलेल्या एलन मस्क यांनी या नव्या अल्कोहोलच्या व्यवसायात प्रवेश केलाय. मस्क यांची नवीन बिअर ही गिगा बिअर टेस्लाकिला (GigaBeer Teslakeela) या अंतर्गत लॉन्च करण्यात आली आहे.

बाजारपेठ काबीज करण्याचा उद्देश

स्पेसएक्सच्या (SpaceX) माध्यमातून आकाशात रॉकेटच्या क्षेत्रात त्यांनी आधीच दबदबा निर्माण केलाय. दुसरीकडे टेस्लाच्या कारच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीवरही आपली मजबूत पकड निर्माण केलीय. मागच्या वर्षी सोशल मीडियाचं अव्वल दर्जाचं प्लॅटफॉर्म ट्विटरही विकत घेतलं. आता नवी बिअर लॉन्च करून या व्यवसायातही मोठी झेप घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. त्याला काही अंशी यशही आलं, असं म्हणावं लागेल. कारण या प्रॉडक्टची केवळ घोषणा केली तर नॅस्डॅकवर त्यांचे शेअर्स वधारले. यातली बाजारपेठ मस्क यांना काबीज करून घ्यायची आहे.

नव्या व्यवसायाच्या संधी

जवळपास 187 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह एलन मस्क जगात श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट आहेत. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाली. कंपनीचं मूल्य जवळपास अर्ध्यावर आलं. मात्र यानंतरही मस्क यांनी आपली विस्तारयोजना स्पष्टपणे जाहीर केल्याचं दिसून येतंय. नव्या व्यवसायाच्या संधी ते शोधताना दिसत आहेत. त्याअंतर्गतच त्यांनी टेस्लाची गिगा बिअर लॉन्च केलीय. याची किंमतही काही कमी नाही. याच्या तीन  पॅकची किंमत जवळपास 96 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत तब्बल 7907 इतकी आहे.

शेअर्समध्येही तेजी

एलन मस्क यांनी बिअरची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. नॅस्डॅकवर 6.24 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. या बिअरची किंमत जरी जास्त असली तरी सर्वसामान्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, त्यावर कंपनीचा नफा अवलंबून असणार आहे. सर्वसाधारणपणे अमेरिकेत एका बिअरची किंमत 4 डॉलरच्या आसपास किंवा त्याहून अधिक आहे. मात्र टेस्लाची बिअर त्याहून अधिक महाग असल्याचं दिसतंय. सध्या ही बिअर अमेरिकेतल्या बाजारपेठेत उपलब्ध होतेय. मात्र जागतिक स्तरावर कोणकोणत्या देशात आणि कधी उपलब्ध होईल, याविषयी मात्र अद्याप कोणतीही माहिती कंपनीनं दिलेली नाही.

स्वत:चा टकीला ब्रॅण्डही तयार केला

टेस्ला स्वतःची टकीला लाँच करण्याची योजना आखत आहे असे ते 2020मध्ये म्हणाले होते. त्यांनी ते करूनही दाखवलं आणि काही तासांतच त्यांनी चांगला व्यवसाय केला. मात्र टेस्लानं स्वतःची दारू विकली नाही. आता गिगा बिअर लॉन्च केली आहे. ही बिअर बनवण्यासाठी सायबरहोप्स (Cyberhops) आणि ब्राऊनी (BrouwUnie) यांच्यासोबत भागीदारी केली आहे.