Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Amazon policy : राजीनामा द्या अन् वर्षभराचा पगार घ्या! युरोपातल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अॅमेझॉनची ऑफर

Amazon policy : राजीनामा द्या आणि एका वर्षाचा पगार घ्या, असं फर्मान ई-कॉमर्स क्षेत्रातली आघाडीची कंपनी अॅमेझॉननं काढलंय. युरोपीयन देशांमध्ये कामगार कायदे अधिक कठोर आहेत. त्यामुळे सहजासहजी कोणालाही कामावरून कमी करता येत नाही. त्यात अॅमेझॉननं ही नवीच ऑफर इथल्या कर्मचाऱ्यांना देऊ केलीय.

Read More

चित्रपटांमुळे पश्चिम रेल्वे विभागाला मिळाला 1.64 कोटींचा महसूल; दरवर्षी यात होतेय लाखोंची वाढ

Shooting on Western Railway: भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. पश्चिम रेल्वे तिकीट विक्रीबरोबरच इतर माध्यमातूनही भरभक्कम कमाई करत आहे. रेल्वेला चित्रपटांच्या शूटिंगमधूनही मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे.

Read More

Razorpay Report: गेल्या आर्थिक वर्षात भारतीयांनी सर्वाधिक पैसा खर्च केला सिनेमा आणि विमान प्रवासासाठी!

गेल्या वर्षभरात भारतीयांनी सगळ्यात जास्त खर्च केलाय तो सिनेमा, विमान प्रवास आणि हॉटेलिंगसाठी. कोविड संसर्ग कमी झाल्यानंतर लोक आता New Normal चा आनंद घेताना दिसत आहेत. जाणून घ्या फुल-स्टॅक पेमेंट्स आणि बँकिंग प्लॅटफॉर्म Razorpay चा हा खास अहवाल.

Read More

BCCI Allowance Hike : बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या भत्यामध्ये वाढ

BCCI Allowance Hike : तब्बल सात वर्षानंतर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या भत्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या एपॅक्स कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. मात्र, याची अंमलबजावणी पूर्वलक्षी स्वरूपात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे.

Read More

HDFC Bank : एचडीएफसी बँकेच्या कर्जदारांसाठी आहे आनंदाची बातमी

HDFC Bank MCLR : एचडीएफसी बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआरशी (MCLR) संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

Read More

Cryptocurrency Regulation: क्रिप्टोकरन्सीवर G20 बैठकीत चर्चा व्हावी, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची अपेक्षा

क्रिप्टोकरन्सीवर अद्याप जागतिक स्तरावर कोणतेही धोरण नाही. मागील काही वर्षात क्रिप्टो मार्केट अनेक वेळा कोलमडले आहे. त्यामुळे G20 बैठकीत याबाबत सखोल चर्चा व्हावी अशी अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे. IMF आणि FSB कडून क्रिप्टोवर टेक्निकल पेपर सादर करण्यात येणार आहे. या पेपरच्या आधारे पॉलिसी तयार केली जाऊ शकते.

Read More

Crypto investment scam : क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करताय? मुंबईतल्या 8 डॉक्टरांची दीड कोटी रुपयांनी झालीय फसवणूक

Crypto investment scam : क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तब्बल 8 डॉक्टरांची फसवणूक करण्यात आली. आता या भल्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी पुणे पोलिसांनी सुरू केलीय. चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून पैसे लुबाडण्यात आले होते. मुंबईतल्या आठ डॉक्टरांची या दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

Read More

Indian Economy: डिजिटल इंडिया आणि कौशल्य विकास कार्यक्रमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Nirmala Sitharaman: गेल्या काही वर्षात भारतात झपाट्याने काही सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. भारत सरकार अनेक लोककल्याणकारी योजना राबवत आहे. नागरीकांना राहण्यासाठी पक्की घरे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वीज आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरे गावांना जोडली जावीत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे.

Read More

General Provident Fund Interest Rate : GPF वर येत्या तिमाहीत किती टक्के व्याज मिळणार

एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) वरील व्याज दर (Interest Rate) 7.1 टक्क्यावर कायम ठेवला आहे. जीपीएफ म्हणजे सामान्य भविष्य निर्वाह निधी होय, ज्यावर सरकार प्रत्येक तिमाहीसाठी व्याजदर निश्चित करते.

Read More

ICICI Pru Mutual Fund : आयसीआयसीआय मध्ये एवढी गुंतवणूक करुन तुम्ही बनु शकता लखोपती

Mutual Fund Investment : मार्केटमध्ये गुंतवणूकीचे अनेक पर्याय असतांना, 10 एप्रिल पासुन सुरु झालेल्या आयसीआयसीआयच्या प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडामध्येच का गुंतवणूक करावी, जाणून घ्या सविस्तर.

Read More

Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरकारकडून 177 कोटी रुपयांची मदत

Unseasonal Rain:मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीतील पिकांची नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये जाहीर केले. शासनाने झालेल्या नुकसानाचा आराखडा घेऊन या मदतीची घोषणा केली आहे.

Read More

Monsoon in India: यंदा मान्सूनचा जोर कमी राहणार! पावसाने दडी मारल्यास महागाई आणखी वाढेल का?

यंदा भारतात मान्सूनचा पाऊस पुरेसा पडणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या इतर अनेक क्षेत्रांसोबत जोडले गेलेले असते. जर कृषी उत्पन्न कमी झाले तर त्याचा फटका इतरही अनेक क्षेत्रांना बसू शकतो. त्यामुळे महागाईत वाढ होऊ शकते. दुष्काळी परिस्थितीची शक्यता 60% असल्याचे स्कायमेट या हवामान अंदाज संस्थेने म्हटले आहे.

Read More