Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Bank : एचडीएफसी बँकेच्या कर्जदारांसाठी आहे आनंदाची बातमी

HDFC Bank MCLR :

Image Source : www.bqprime.com

HDFC Bank MCLR : एचडीएफसी बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआरशी (MCLR) संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

MCLR : आता एचडीएफसीचे कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे अशी की, HDFC बँकेने एमसीएलआर संलग्न कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे आता लोनधारकांच्या EMI मध्ये जाणारी रक्कम थोडी कमी होईल. रेपो दर, आर्थिक मंदी यासारख्या गोष्टी असतांना देखील या बँकेने व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 6 एप्रिल 2023 रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत रेपो दरात काहीच बदल न करता  6.5 टक्के ठेवल्यानंतर HDFC बँकेचा MCLR कमी करण्याचा हा निर्णय झाला. कारण, RBI रेपो रेटमधील बदलाचा MCLR दरावर परिणाम होतो, ज्यावरुन कर्जाचा व्याजदर ठरविल्या जातो.

एमसीएलआर दर म्हणजे काय?

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट हा मूलभूत किमान दर आहे. या दराचा आधार घेऊनच बँका कर्जदारांना कर्ज देतात. विविध प्रकारच्या कर्जांचे व्याजदर निश्चित करण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे MCLR ची स्थापना करण्यात आली होती.

एचडीएफसी बँक एमसीएलआर दर

  1. एचडीएफसी बँकेने काही ठराविक कालावधीसाठी 85 बेस पॉइंट्स (100 बेस पॉइंट्स म्हणजे 1 टक्के) पर्यंत मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR)कमी केला आहे. 
  2. बँकेच्या वेबसाइटनुसार,नवीन कर्ज दर 10 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. 
  3. दरांमध्ये कपात केल्यानंतर, त्याचा MCLR एका रात्रीत 85 बेसिस पॉईंटने 7.80 टक्क्यांनी खाली आला आहे, तर पूर्वी तो 8.65 टक्के होता.
  4. एका महिन्याचा MCLR ८.६५ टक्क्यांवरून ७.९५ टक्क्यांवर आला आहे. 70 बेसिस पॉइंट्सची मोठी घट झाली आहे.
  5. तीन महिन्यांचा MCLR 40 बेसिस पॉइंट्सने कमी करून 8.30 टक्के करण्यात आला आहे, पूर्वी तो 8.7 टक्के होता.
  6. सहा महिन्यांचा MCLR 10 बेसिस पॉइंट्सने कमी करून 8.7 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 8.80 टक्के होता.

MCLR ची भूमिका काय?

बँकेने MCLR मध्ये कोणताही बदल केल्यास कर्जाच्या किमतीवर म्हणजेच व्याजदरावरही परिणाम होतो.एचडीएफसी बँकेने एमसीएलआर कमी केला आहे,म्हणजेच ईएमआयची रक्कमही कमी होईल.MCLR हे वाजवी आणि खुल्या व्याजदराने कर्ज देताना बँकांनी वापरण्यासाठी ते बेंचमार्क दर म्हणून कार्य करते.

HDFC बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. संपूर्ण भारतातील ग्राहकांना फोन बँकिंग,नेट बँकिंग,मोबाईल बँकिंग आणि एसएमएस आधारित बँकिंग यांसारख्या अनेक वितरण माध्यमांद्वारे सेवा दिली जाते.