देशभरातच नाही तर जगभरातील अनेक लोक महागाईने हैराण आहेत. जगावर आर्थिक मंदीच सावट असताना, मोठमोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत असताना मागील आर्थिक वर्षात भारतीयांनी मात्र सिनेमा आणि विमान प्रवासावर सर्वाधिक पैसे खर्च केल्याचे रोझरपेच्या एका अहवालात म्हटले आहे.
कोविड संसर्गानंतर आता कुठे सगळे आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहे. गेली दोन-अडीच वर्षे लॉकडाऊन अनुभवल्यानंतर मागील वर्षी भारतीयांनी कुठल्याही प्रतिबंधाशिवाय हॉटेलिंग, सिनेमा आणि प्रवासाचा आनंद घेतल्याचे दिसते आहे. प्रवासासाठी सर्वाधिक विमान यात्रेला नागरिकांनी पसंती दिल्याचेही अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी विमान तिकिटांवरचा खर्च तब्बल 83 टक्क्यांनी वाढला असून हॉटेलिंगचा खर्च देखील दुप्पट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
फुल-स्टॅक पेमेंट्स आणि बँकिंग प्लॅटफॉर्म Razorpay च्या अहवालानुसार, ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्सनी एप्रिल 2022-मार्च 2023 या कालावधीत व्यवहारात 224 टक्के वाढ झाली आहे आहे. पिकनिक प्लॅन करणे, कुटुंबासमवेत बाहरेगावी सुट्ट्या घालवणे यांत मोठ्या प्रमाणात खर्च वाढला असल्याचे अहवालात म्हटले आहे.
Powering the financial nervous system of India gives us a front row seat to the entrepreneurs working their magic ?
— Razorpay (@Razorpay) April 11, 2023
We look at the #YearInPayments to see how culture, life and you, moved in 2022-23.
Full report here: https://t.co/1ELUsYh1ab pic.twitter.com/XK8lmOsGnI
भारत देश हा चित्रपटांचा देश मनाला जातो. वर्षाला शेकडो चित्रपट भारतात बनतात, प्रदर्शित होतात आणि करोडोंची उलाढाल करतात. लॉकडाऊन काळात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, सोनी लाईव्ह आदी ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ओटीटीवर प्रेक्षकांनी सिनेमांचा आस्वाद घेतला होता. कोरोना प्रतिबंध शिथिल झाल्यानंतर हळूहळू सिनेमाघरे खुली झाली. त्यानंतरचित्रपटांवरील ग्राहकांच्या खर्चात तब्बल 173 टक्के वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. सोबतच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' चित्रपटाच्या लॉन्चिंगनंतर मल्टिप्लेक्स व्यवहारात दररोज सरासरी 70 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे देखील या अहवालात स्पष्ट केले गेले आहे. यावरून 'पठाण' सिनेमाची लोकप्रियता किती होती याची कल्पना येते.
मुंबई, बेंगळुरू, चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये ऑफिसचे भाडे परवडत नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी को-वर्किंग स्पेसचा आधार घेतलाय. याबाबतीतल्या व्यवहारांमध्ये सुमारे 245 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे असे निदर्शनास आले आहे. सोबतच खासगी कॅब सुविधा देणाऱ्या ओला, उबेर, मेरू यांचा वापर देखील गेल्या वर्षांपासून वाढला असल्याचे अहवालात म्हटले आहे.ऑनलाईन कॅब बुकिंगसाठी केलेल्या पेमेंटमध्ये 7 पट वाढ नोंदवली गेली आहे.
डिजिटल पेमेंटची सामान्य नागरिकांना सवय लागली असून, झटपट सेवा देणाऱ्यामोबाईल ऍपचा वापर देखील वाढला आहे. रोख पैशात व्यवहार करण्यापेक्षा UPI पेमेंट करण्यास अनेकजण पसंती दर्शवत आहेत.
असे असले तरी ब्रॉडबँड खर्च जवळजवळ 80 टक्क्यांनी कमी झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. 5G नेटवर्क एवा देणाऱ्या कंपन्यांना लोक पसंती देत आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची सुविधा बंद केल्यामुळे आता कर्मचारी ऑफिसमधून काम करत आहेत. परिणामी लॉकडाऊन काळात ब्रॉडबँडला असलेली मागणी आता 80 टक्क्यांनी कमी झाली आहे.
Source: https://rb.gy/nj3j1