Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon policy : राजीनामा द्या अन् वर्षभराचा पगार घ्या! युरोपातल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अॅमेझॉनची ऑफर

Amazon policy : राजीनामा द्या अन् वर्षभराचा पगार घ्या! युरोपातल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अॅमेझॉनची ऑफर

Amazon policy : राजीनामा द्या आणि एका वर्षाचा पगार घ्या, असं फर्मान ई-कॉमर्स क्षेत्रातली आघाडीची कंपनी अॅमेझॉननं काढलंय. युरोपीयन देशांमध्ये कामगार कायदे अधिक कठोर आहेत. त्यामुळे सहजासहजी कोणालाही कामावरून कमी करता येत नाही. त्यात अॅमेझॉननं ही नवीच ऑफर इथल्या कर्मचाऱ्यांना देऊ केलीय.

सध्या सर्वत्र लेऑफ (Layoffs) म्हणजेच कामगार कपात सुरू आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देऊन पैसा वाचवण्याचा प्रयत्न केलाय. ही कर्मचारी कपात इतक्या मोठ्या प्रमाणावर होतेय, की मागच्या वर्षीपासून जॉब कट (Job cut) हा एक प्रमुख की-वर्डच बनून गेलाय. अॅमेझॉननं एका झटक्यात 18,000 नंतर 9000 आणि पुन्हा विविध विभागातल्या छोट्या मोठ्या पदांवरच्या कामगारांना कमी करण्याचा सपाटा लावला आहे. यासोबत गुगल (Google), मेटा (फेसबुक), अॅक्सेंचर (Accenture) आणि इतर तब्बल 570 टेक कंपन्यांनी 2022-23 या कालावधीत 1,68,918पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं आहे. हा ट्रेंड इतक्यात बदलेले अशी शक्यताही वाटत नाही. जगभर विस्तारलेल्या या टेक कंपन्या अद्याप नोकरकपात थांबवण्याच्या विचाराच नाहीत. टप्प्याटप्प्यानं ही कपात होतेय.

कामगार संरक्षण कायद्यांमुळे कंपन्यांची अडचण

युरोपातही कर्मचाऱ्यांची कपात करण्यावर या कंपन्यांचा भर आहे. मात्र याठिकाणी कामगार संरक्षण कायद्यांमुळे अशाप्रकारची बेकारीची कुऱ्हाड सध्या तरी इथल्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कोसळलेली नाही. कंपनीला अशाप्रकारची कारवाई करायची असेल तर संबंधित देशातल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या गटांशी आधी चर्चा करावी लागणार आहे. त्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला काढून टाकता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या रक्षणाच्या या कायद्यानुसार, कंपन्यांनी कर्मचारी कपातीची अंमलबजावणी करण्यापूर्वी कायदेशीररित्या या कौन्सिलशी चर्चा करणं आवश्यक आहे. डेटा संकलन, चर्चा आणि अपील करण्याच्या पर्यायाची संभाव्य वेळखाऊ प्रक्रिया या सर्व बाबींचा यात समावेश असतो. त्यामुळे या फंदात पडण्यापेक्षा अॅमेझॉननं नवीन ऑफरच आपल्या कर्मचाऱ्यांना दिलीय. सर्च इंजिन गुगल आणि ई-कॉमर्स क्षेत्रातली प्रमुख कंपनी अॅमेझॉननं आपल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छेनं राजीनामा (Voluntary retirement) द्यावा, असं म्हटलं आहे.

चांगल्या पॅकेजचं आश्वासन

लेऑफच्या ही एक समस्या असून त्याचं निराकरण करण्यासाठी फ्रान्स आणि जर्मनीमधल्या या गटांकडून गुगल मदत घेत आहे, अशाप्रकारची बातमी ब्लूमबर्गनं दिली. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आयएनसी (Alphabet Inc) फ्रान्समधल्या आपल्या कर्मचार्‍यांशी चर्चा करत आहे. स्वेच्छेनं राजीनामा द्यावा. त्याबदल्यात त्यांना चांगलं पॅकेज दिलं जाईल, असं आश्वासनही दिलं जातंय. अशाचप्रकारे अॅमेझॉननंही स्वेच्छा निवृत्तीची घोषणा केलीय. आपल्या काही वरिष्ठ व्यवस्थापकांनी स्वेच्छेनं राजीनामा दिल्यास त्यांना एक वर्षाचं पॅकेज ऑफर केलं आहे. कामावरून कमी केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शेअर्स होऊ शकतात. तेच त्यांना बोनस म्हणून दिले जातील, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

यूकेमध्ये जाण्याचा पर्याय

युरोपातला महत्त्वाचा देश म्हणजे जर्मनी. इथल्या प्रोबेशनरी कालावधीत असलेल्या कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन कमी करत आहे. स्वेच्छेनं राजीनामा देण्याचा पर्याय त्यांना देऊ केला जात आहे. या व्यतिरिक्त अंदाजे 8,000पैकी 500 गुगल कर्मचार्‍यांना यूकेमध्ये जाण्याचा पर्याय देण्यात आलाय. कारण इंग्लंडमध्ये कामगार संरक्षण फारसं कठोर नाही. याव्यतिरिक्त, गुगल डब्लिन आणि झुरिचमधल्या काही कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. याचा जवळपास 200 कार्मचाऱ्यांना फटका बसणार असल्याचं ब्लूमबर्गनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.