देशातलं पहिलं 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान लार्सन अँड टुब्रो (L&T) या कंपनीमार्फत बेंगळुरूच्या उलसूरमधल्या केंब्रिज लेआउटमध्ये हे पोस्ट ऑफिस उभारलं जातंय. सुमारे 23 लाख रुपये यासाठई खर्च येणार आहे. सामान्य पोस्ट ऑफिस बांधण्यासाठी जो खर्च येतो त्यापेक्षा सुमारे 30 ते 40 टक्के कमी खर्च यामध्ये येणार आहे. 3D प्रिंट केलेलं हे पोस्ट ऑफिस सुमारे 1,000 चौरस फूट आकाराचं असणार आहे. हे पोस्ट ऑफिस साधारणपणे 45 दिवसांत बांधून पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असं एका अहवालानुसार सांगण्यात येतंय.
Table of contents [Show]
अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न
कर्नाटक सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एस. राजेंद्र कुमार यांनी 'द संडे एक्सप्रेस'ला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अनावश्यक खर्च टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे तंत्रज्ञान भविष्यकाळातलं एक चांगलं तंत्रज्ञान ठरेल, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आपणही अशा भक्कम पर्यायाचा वापर करावा, हा विचार आम्ही केली. तंत्रज्ञान असूनदेखील यात येणारा खर्च कमी आहे.
किरण मुझुमदार-शॉ यांच्याकडून कौतुक
3D प्रिंटिंग तंत्रज्ञानासाठी एलअँडटी कन्स्ट्रक्शनच्या प्राथमिक फोकसमध्ये G+3 मजल्यापर्यंत परवडणारी घरं, व्हिला, मिलिटरी बॅरेक्स आणि सिंगल-फ्लोअर स्कूल, पोस्ट ऑफिस आणि कारखाने यांचा समावेश आहे. आम्ही 3D प्रिंटेड स्ट्रक्चर्सचा पोर्टफोलिओ विविध ठिकाणी विस्तारित करण्याचा अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहोत, अशी माहितीही देण्यात आलीय. पोस्ट ऑफिस ही एक सरकारी इमारत आहे. अशाप्रकारचं काम करून किरण मुझुमदार-शॉ यांनी सर्वांनाच प्रभावित केलंय. किरण मुझुमदार-शॉ या बायोकॉनच्या प्रमुख आहेत.
Country’s first 3D-printed post office coming up in Bengaluru - hope this is the shape of things to come!! https://t.co/IpmhbDXYER
— Kiran Mazumdar-Shaw (@kiranshaw) April 10, 2023
महिनाभरात पूर्ण होणार काम
बंगळुरूतल्या पायाभूत सुविधा आणि इथल्या प्रगतीबद्दल किरण मुझुमदार-शॉ या नेहमीच आपली मतं व्यक्त करत असतात. आताही या कामाचं त्यांनी कौतुक केलंय. दरम्यान, महिनाभरात हे काम पूर्ण होईल. मात्र या संबंधित बांधकाम व्यावसायिकांना घाईघाईनं बांधकाम करण्यास आम्ही सांगितलेलं नाही, सर्व काम वेळेत होणार असलं तरी ते व्यवस्थित, सर्व नियमांना धरून असेल, असं प्रशासनानं स्पष्ट केलंय.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट
अशाप्रकारच्या बांधकामानं अनेकजण प्रभावित झालेत. या बिल्डिंगचं काम सुरू असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट केलेत. विशेषत: इमारतीच्या जवळच्या रहिवाशांनी. एकीनं लिहिलंय, अरे वा. माझा घराबाहेर 3D प्रिंटिंग बिल्डिंग बांधली जातेय. आणखी एकानं व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, भविष्यात अशा तंत्रज्ञानाचा वापर करून घरं, कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारले जातील.
Look ma, they are 3D printing a building outside my house! @peakbengaluru pic.twitter.com/GVrRoC0b9u
— Marisha Thakur (@MarishaThakur) April 6, 2023
3D तंत्रज्ञान असलेलं पहिलं सार्वजनिक बांधकाम
बांधकाम करणाऱ्या लार्सन अँड टुब्रोनं याविषयी सांगितलं, की तंत्रज्ञानाला बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञान प्रोत्साहन परिषदेनं (BMTPC) मान्यता दिली आहे. पोस्ट ऑफिसच्या स्ट्रक्चरल डिझाइनला IIT मद्रासनं प्रमाणित केलं आहे. एल अँड टी कन्स्ट्रक्शनचे (इमारती) पू्र्णवेळ संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष एम. व्ही. सतीश यांच्या मते, पोस्ट ऑफिस हे 3D तंत्रज्ञान वापरून बांधलं जाणारं कर्नाटकातलं पहिलं सार्वजनिक बांधकाम आहे. प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. ही इमारत बेंगळुरूमध्ये एक स्मॉल लँडमार्क बनण्याची शक्यता आहे.