BCCI Allowance Hike : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय. सर्वात श्रीमंत क्रिकेट असोसिएशन म्हणून नावाजलेली अशी ही संस्था आहे. गेल्या वर्षी बीसीसीआयने महिला क्रिकेटर्सच्या मानधनामध्ये भरघोस वाढ केली. पहिल्यांदाच महिला आयपीएल सुद्धा आयोजीत केले. या सर्व धडाकेबाज निर्णयानंतर आता या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या भत्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, खजिनदार व सह-सचिव यांचा समावेश आहे.
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या भत्यांमध्ये वाढ
आताच्या नविन निर्णयानुसार बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना परदेशी प्रवासासाठी 1 हजार डॉलर मिळणार आहेत. भारतीय चलनानुसार आणि आताच्या डॉलरच्या रेटनुसार साधारण 82 हजार रूपये पदाधिकाऱ्यांना दिले जाणार आहेत. यापूर्वी परदेश दौऱ्यासाठी 750 डॉलर म्हणजे साधारण 61 हजार रूपये दिले जायचे.
एपॅक्स कौन्सिलच्या निर्णयानुसार भारतात घेतल्या जाणाऱ्या बैठकीसाठी 40 हजार रूपये दिले जाणार आहेत. सोबतच बैठकीला प्रवास खर्च म्हणून बिझनेस क्लासमधुन प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बीसीसीआय मंडळाच्या काही कामानिमित्ताने प्रवास केला असेल तर त्यासाठी आणि देशांतर्गत प्रवासासाठी प्रत्येकी 30 हजार रूपये भत्ता दिला जाणार आहे. दरम्यान, आयपीएल अध्यक्षांना सुद्धा यानुसारच भत्ते दिले जाणार आहेत.
BCCI allowance hike - President, Secretary, Vice President, Treasurer and Joint secretary will per day get (Reported by PTI):
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2023
- 82,000 - for Foreign tour.
- 40,000 - for meeting.
- 30,000 - for work travel.
- 30,000 - for domestic travel.
- Business Class tickets for meetings!
क्रिकेट सल्लागार समितीचे भत्ते
पुरूष व महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकांची नेमणुक करणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीच्या तीन सदस्यांना बैठकीसाठी प्रत्येकी 3.5 लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन सदस्यांच्या परदेश दौऱ्यासाठी 400 डॉलर म्हणजे दर दिवशी 32 हजार रुपये खर्च दिला जाईल.
source : https://bit.ly/3UuTfHh