Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electricity Bill: विजबिल कमी करण्यासाठी काय उपाय करू शकतो?

Electricity Bill

Electricity Bill: उन्हाळा सुरू झाला की विजेचा वापर सुद्धा वाढतो. फॅन, कुलर, एसी, फ्रीज या सर्व उपकरणांचा वापर सुरू होतो त्यामुळे विजबिलाच्या रकमेत वाढ होते. वीज बील कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सोपा मार्ग म्हणजे आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे.

Electricity Bill: उन्हाळा सुरू झाला की विजेचा वापर सुद्धा वाढतो. फॅन, कुलर, एसी, फ्रीज या सर्व उपकरणांचा वापर सुरू होतो त्यामुळे विजबिलाच्या रकमेत वाढ होते. वीज बील कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सोपा मार्ग म्हणजे आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे. म्हणजेच गरजेशिवाय वीज वापरू नये. त्यानंतर आपल्या घरात जे  उपकरणे वापरत आहोत, ती योग्य प्रकारे कार्यान्वित आहेत का हेही चेक करणे तवढेच महत्वाचे आहे. 

आपल्या घरात जर 10 ते 12 वर्षांपूर्वीचा फ्रीज किंवा Washing machine वापरत असाल तर ते खूप जास्त वीज वापरते. या काळात तंत्रज्ञान मोठ्या वेगाने बदललेले आहे. कमी विजेत जास्त कार्यक्षमता देणारी उपकरणे बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्याचाही वापर करून विजबिल कमी करू शकता.

electricity-bill-1.jpg

विजबिलात कपात करण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा 

कोणतेही विद्युत उपकरण घेत असतांना ग्रीन टॅग (5स्टार)असलेल्या वस्तू घेणे. घरातील LED लाईटचा उपयोग करणे. मोबाईल फोन चार्ज झाले की चार्जरची स्विच बंद करणे. टीवीचा brightness शक्यतो कमी करणे. हिवाळ्यात फ्रिजचा compression deo point कमी ठेवा. घरातूनबाहेर पडत असताना लाइट व फॅन बंद करा. TV बघून झाल्यावर रिमोटवर न करता स्विच वरून बंद करा.

आपला भारत देश हा कितीही प्रगत झाला असला तरी कित्येक खेडेगावांत आजही सुखसुविधांचा अभाव आहे. त्यातलीच एक सुविधा म्हणजे वीज. अशी कित्येक गावं आहेत जी आजही अंधारात आहेत. शहरी भागांत राहणारी मंडळी ब-याचदा विजेचा अपव्यय करतात. तो अपव्यय कमी केला आणि वीजेची बचत केली तर अंधारात जीवन जगणा-यांनासुद्धा वीज मिळेल.

ऊर्जा बचतीचं प्रमाणपत्र लाभलेल्या उपकरणांचाच वापर करावा

घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसंच ऊर्जा बचतीचं प्रमाणपत्र लाभलेल्या उपकरणांचाच वापर करावा. स्वस्त आणि दर्जाहीन तारांमुळे विजेचा सुयोग्य वापर होऊ शकत नाही. तसंच अशा तारांमुळे आग लागण्याची शक्यताही तितकीच असते. म्हणूनच प्रमाणित उपकरणे वापरली तर बचत होऊ शकते.

भारतात सूर्यप्रकाशाचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे सोलार अर्थात सूर्याच्या प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता येईल. पण आपल्या प्रयत्नांनी एखाद्याच्या घरातला अंधार दूर होत असेल तर हे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. विजेची उपकरणं स्वच्छ असतील तरंच जास्त ऊर्जा मिळेल आणि विजेचा वापर कमी होईल. इस्त्रीची निवड करताना, ऑटोमॅटिक इस्त्री खरेदी करावी. जेणेकरून विशिष्ट तापमानाला इस्त्री बंद होईल.

फ्रिजमधून वस्तू काढताना आवश्यक वस्तू एकदाच काढाव्यात, जेणेकरून फ्रिज सतत उघडावा लागणार नाही. सतत फ्रिज उघडल्याने फ्रिजचं तापमान बिघडतं आणि जास्त वीज खर्च होते. डीफ्रॉस्ट करावे लागणारे रेफ्रिजरेटर्स आणि फ्रिजर्स नियमितपणे डिफ्रॉस्ट करावेत, बर्फ जमा झाल्यामुळे मोटर चालू ठेवण्यासाठी फ्रीजला जास्त ऊर्जा लागते. 

शाश्वत जीवन शैलीचा वापर करून सुद्धा विजेची बचत होऊ शकते. 

a-sustainable-lifestyle-5.jpg

सौर गिझरचा वापर करू शकता 

आंघोळीसाठी पाणी गरम करताना गिझरचाच प्रामुख्याने वापर केला जातो. काही जणांना अगदी कडकडीत पाणी लागतं म्हणून आंघोळ होईपर्यंत गिझर चालू ठेवतात. यामुळे वीज खर्च होते. या गोष्टीला आळा बसण्यासाठी बादलीत एकदाच पाणी घ्यावं आणि गिझर लगेचच बंद करावा.

आतापर्यंत आपण घराच्या विजेबद्दल विचार केला, पण आपण आपल्या घराच्या अवतीभवती असणा-या विजेचीसुद्धा बचत करू शकतो. इमारतीमध्ये दोन लिफ्ट्स असल्यावर लिफ्ट लवकर येण्यासाठी दोन्ही बटण दाबतात, असं केल्याने बरीच वीज खर्च होते. यासाठी योग्य लिफ्ट्सचं बटण दाबावं.

सौर उर्जेवर चालणारे गिझरदेखील योग्य ठरते. त्यामुळे विजेची बचत सुद्धा होते आणि आरोग्यही चांगले राहते. इलेक्ट्रिक बाबींचा जास्त वापर सुद्धा शरीरासाठी हानिकारक असतात. सौर उर्जेवर चालणारे उपकरणे म्हणजे एक प्रकारे नैसर्गिकच असतात त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या खर्च सुद्धा वाचतो. 

(News Source: https://www.quora.com)