Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PAN card number : पॅन कार्डवरचे नंबर काय दर्शवतात? जाणून घ्या सविस्तर...

PAN card number : पॅन कार्डवरचे नंबर काय दर्शवतात? जाणून घ्या सविस्तर...

PAN card number : पॅन कार्डवर असलेले अंक एका विशिष्ट अर्थानं वापरलेले असतात. पॅन कार्ड हे आपल्या सर्वच प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी एक महत्त्वाचं साधन आहे. मात्र पॅन कार्डवर एक क्रमांक असतो. या क्रमांकाचा अर्थ नेमका काय? याचं उत्तर कदाचित अनेकांना देता येणार नाही. मात्र याच क्रमांकाच्या आधारे आयकर विभाग आपली माहिती घेत असतो.

आपल्या पॅन कार्डवर एक 10 अंकी कायमस्वरुपी (Permanently) क्रमांक असतो. यात सर्व प्रकारची माहिती असते. या क्रमांकांमध्ये जी माहिती लपलीय, त्याचा मागोवा आयकर विभाग (Income tax department) घेत असतं. हीच गोष्ट समोर ठेवून नागरिकांना पॅन कार्ड दिलं जातं. पण आपल्यापैकी किती जणांना या पॅन कार्डवरच्या नंबर्सविषयी माहिती आहे? फारच कमी जणांना याविषयीची माहिती आहे. पॅन कार्डवरच्या अल्फान्यूमेरिक (Alphanumeric) नंबरचा नेमका अर्थ काय, हेच आपण जाणून घेऊ...

आडनाव अक्षरांमध्ये लपलेले आहे

पॅन कार्डवर कार्डधारकाचं नाव आणि जन्मतारीख नमूद केलेली असते. मात्र पॅन कार्ड क्रमांकामध्ये तुमचं आडनावही लपवलेलं असतं. पॅन कार्डचा पाचवा अंक तुमचं आडनाव दर्शवत असतो. प्राप्तिकर विभाग आपल्या माहितीमध्ये केवळ कार्डधारकाचं आडनाव नोंदवत असतो. त्यामुळे खाते क्रमांकातही  त्याची माहिती आहे. कर विभाग मात्र ही माहिती कार्डधारकांना कधीच देत नाही.

करापासून ते क्रेडिट कार्डपर्यंत देखरेख केली जाते

पॅन कार्डचा क्रमांक हा एक वैशिष्ट्यपूर्ण 10 अंकी क्रमांक असतो. पॅन कार्ड लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येत असतं. आयकर विभागामार्फत पॅन कार्ड हे अर्ज करणाऱ्यास उपलब्ध करून देत असतं. एकदा पॅनकार्ड तयार झालं, की त्या व्यक्तीचे सर्वच आर्थिक व्यवहार हे या पॅनकार्डशी लिंक केले जात असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर आकारणी, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार, विविध सरकारी बचत योजना तसंच इतर अनेक आर्थिक बाबी या माध्यमातून पूर्ण होत असतात. हे सर्व गोष्टी आयकर विभागाच्या देखरेखीखाली होतात.

पहिली तीन इंग्लिश आद्याक्षर

पॅन कार्ड क्रमांकात पहिले तीन हे इंग्लिशमधली अक्षरं आहेत. यात AAA ते ZZZ यादरम्यान कोणतंही अल्फाबेट असू शकतं. सद्यस्थितीत चालू असलेल्या मालिकेनुसार ते ठरवलं जातं. हा क्रमांक कोणता असावा, हे विभाग स्वत: ठरवतं. पॅनकार्ड क्रमांकाचा चौथा अंकदेखील इंग्रजीतलं एक अक्षर आहे. मात्र त्याचा उपयोग कार्डधारकाची स्थिती दर्शवत असतं. यामध्ये हा चौथा अंक खालीलपैकी असू शकतो...

पॅन कार्डवरचा चौथा अंक

What does the fourth digit on PAN card indicate (1)

पाचवा अंक म्हणजे आडनावाचं आद्याक्षर/अल्फाबेट

पॅन कार्ड क्रमांकामधला पाचवा अंक हेही एक इंग्लिश अक्षरच असतं. यातून संबंधित व्यक्तीचं आडनाव प्रदर्शित होत असतं. म्हणजेच आडनावाचं पहिलं अक्षर (इंग्लिशमधून). हे केवळ धारकावर अवलंबून असतं. विशेष म्हणजे यात धारकाचं केवळ आडनाव दिसतं. इंग्लिश अक्षरांचा हा खेळ पार पडल्यानंतर पॅन कार्डमध्ये 4 क्रमांक येतात. हे आकडे 0001 ते 9999पर्यंत कोणतेही असू शकतात. आयकर विभागाची तत्कालिन मालिका जी सुरू असेल त्याप्रमाणे ते अंकही बदलत जातील. त्याचं हे प्रतिनिधीत्व करतात. तर त्याचा शेवटचा अंक हा वर्णमाला तपासणी अंक आहे. हेदेखील कोणतंही अक्षर असू शकतं.

आर्थिक व्यवहारांसाठी गरजेचं डॉक्युमेंट 

आयकर विभागामार्फत देशातल्या नागरिकांना पॅन कार्ड दिलं जातं. यामुळे करात सवलत, विविध सरकारी योजना, बँक तसंच डी-मॅट खातं अशा व्यवहारांमध्ये सुलभता येते. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठीदेखील पॅन एक आवश्यक बाब आहे. करपात्र वेतन तसंच आयकर विवरणपत्र भरण्यासाठीही पॅन कार्ड आवश्यक आहे. आपल्या लॅमिनेटेड पॅन कार्डवर आपलं नाव आणि छायाचित्र असतं. शिवाय अंक आणि इंग्लिश आद्याक्षराच्या माध्यमातून आपली सर्व माहिती असते. त्यामुळे हे डॉक्युमेंट ओळखीचा पुरावा म्हणूनही काम करतं. आपलं राहण्याचं ठिकाण बदललं किंवा पत्ता बदलत राहिलो तरी पॅन नंबर मात्र कधीच बदलत नाही.

गैरव्यवहारावर रोक

आपल्या पॅन कार्डवरच्या क्रमांकाचा वापर करून अनेकजण गैरव्यवहारही करू शकतात.  कारण बहुतांश वेळेला व्यवहार ऑनलाइन, मोबाइलवर होत असतात. त्या माध्यमातून आपली माहिती चोरी होण्याची शक्यता वाढते. पण जर कोणी गैरव्यवहार केला असेल तर आयकर विभागामार्फत 26AS फॉर्म भरून याचा तपशील मिळवता येतो.