Singh Couple Earns 45 Carore Rupees Annually : पंतप्रधान मोदींनी स्टार्टअप सुरु करणाऱ्या युवकांना प्रेरणा देणे सुरु केल्यापासुन, अनेक नवनवीन स्टार्टअप उद्यास आले. स्टार्टअप सुरु करणाऱ्या युवकांना सरकार आणि बँकांकडून कर्ज देखील दिले जाते. बंगळुरूमधील व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाने चांगली नोकरी सोडून स्टार्टअपच्या जगात प्रवेश केला आणि समोसे विकण्यास सुरुवात केली.
Table of contents [Show]
कंपणीची वार्षिक उलाढाल 45 कोटीं
वर्ष 2015 मध्ये बंगळुरूमधील एका तरुण जोडप्याने आपली नोकरी सोडली आणि कर्नाटकच्या राजधानी शहरात समोसा सिंग नावाने फूड स्टार्टअप सुरु केले. आज या तरुणाने सुरु केलेला व्यवसाय इतका प्रचंड वाढला की, त्याच्या कंपणीची वार्षिक उलाढाल 45 कोटीं रुपयांच्या पूढे गेली आहे.
दररोज विकतात 12 लाखांचे समोसे
बंगळुरूचे फूड स्टार्टअप समोसा सिंग दिवसाला 12 लाख रुपयांचे समोसे विकतात. आजही देशातील अनेक लोकांना म्हणजे 80 टक्के लोकांना समोसा प्रचंड आवडतो. आणि देशातील अनेक नोकरदार लोकांचा सायंकाळचा नाश्ता समोसा हा आहे. हीच बाब हेरुन व्यावसायिक शिक्षण घेऊन चांगली नोकरी करणाऱ्या बंगळूरु येथील एका तरुणाने नोकरी सोडून स्टार्टअप सुरु केले.
नोकरी सोडून केला व्यवसाय सुरु
निधी सिंग आणि तिचा पती शिखर वीर सिंग यांच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झालीत. हरियाणामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक शिकत असताना दोघांची भेट झाली. शिखरने हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेसमधून एमटेक केले आणि बायोकॉनमध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर 2015 मध्ये त्याने नोकरी सोडली. तर शिखर वीर सिंगची पत्नी निधी ही देखील एका फार्मा कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करीत होती. या दोघांनीही 2015 मध्ये नोकरी सोडली.
दोन्ही पत्नीला गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी असुनही त्यांनी नोकरी सोडली. आणि आपल्या बचतीमधून समोसा सिंग नावाचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी आपले घर देखील विकले आणि व्यवसाय मोठा केला, असे सिंग सांगतात.
येथे मिळतात सर्व प्रकारचे समोसे
फूड कोर्टबाहेर एका मुलाला समोसा खाण्यासाठी रडतांना बघुन शिखर वीर सिंगला समोसा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. आता या समोसा सिंग मध्ये कढई पनीर समोसा पासून ते नुडल्स समोसा पर्यंत सर्व प्रकारचे समोसे मिळतात.