Lamborghini ने भारतीय बाजारात Urus S मॉडेल आणलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जागतिक स्तरावर लाँच करण्यात आलेल्या Urus चा हा नवीन प्रकार आहे. आणि SUV चे आरामदायी मॉडेल म्हणून Urus Performante बरोबर या मॉडेलची बरोबरी केली जाऊ शकते. नवीन Lamborghini Urus S भारतात एक्स शोरुम 4.18 कोटी रुपयांना लाँच करण्यात आली आहे.
काय आहेत सुविधा
Lamborghini Urus S ला पॉवरिंग 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 657 bhp आणि तब्बल 850 Nm पीक टॉर्क देते. तर ही गाडी केवळ 3.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने धावण्याचा दावा केला जाते आणि या गाडीचा सर्वाधिक वेग 305 किमी प्रतितास आहे. Urus च्या S प्रकारात सहा ड्रायव्हिंग मोड आहेत, ज्यामध्ये Strada, Sport, Corsa, Terra, Neve आणि Sabbia यांचा समावेश आहे. तथापि, एक नवीन ईजीओ मोड देखील आहे, जो प्रत्येक वातावरणात सर्वांगीनदृष्या आरामदायी आणि स्पोर्टी SUV अनुभव प्रदान करण्याचा दावा केला जातो.
Urus चं व्यावसायिक यश
20,000 हून अधिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या Urus चे व्यावसायिक यश Lamborghini Urus S च्या लाँचिंगच्या माध्यमातुन जगापूढे आलेलं आहे. लँबॉर्गिनीची युरस एस ही गाडी SUV प्रकारातील पहिले टिकाऊ आणि तंत्रज्ञानाने अद्यावात असे मॉडेल असल्याने Urus च्या क्रेडेन्शियल्सचा पुरावा आहे. ही गाडी SUV कार्बन फायबर सन रुफसह किंवा त्याशिवाय ग्राहक चॉईस करु शकतात.
Urus S ला Urus Performante पेक्षा वेगळे बनवते ते म्हणजे जुन्या Urus प्रमाणे एअर सस्पेंशनचा वापर. Performante कॉइल-स्प्रिंग सस्पेंशनसह येते जे अधिक कडक आहे आणि त्यामुळे स्पोर्टियर ड्राइव्हसाठी चांगली कार्यक्षमता आणि स्थिरता प्रदान करते.