Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shilpa Shetty Mercedes-Benz SUV : एअरपोर्टवर दिसलेली शिल्पा शेट्टीची महागडी कार कुठली?

Shilpa Shetty Mercedes-Benz SUV

Image Source : www.socialnews.com

Shilpa Shetty : अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या विविध लुकमुळे सदैव चर्चेत राहतात. मात्र गेल्या काही वर्षांपासुन ते त्यांच्या नवनवीन वाहनांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा देखील तिच्या 'मर्सिडीज़-बैंज GLS600 मेबैक लग्जरी SUV' गाडीमुळे चर्चेत आहे. कारण तिच्या या गाडीची किंमत तब्बल 3.5 कोटी रुपये आहे.

Shilpa Shetty Mercedes-Benz SUV: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या फिटनेस, लुक, आणि स्टाईल साठी प्रसिध्द आहे. तिच्या इंडो वेस्टर्न लूकवर चाहते आजही घायाळ होतात. अलिकडेच शिल्पा एअरपोर्टवर तिच्या नवीन मर्सिडीज कारमधुन बाहेर पडतांना दिसली. तिने ही कार काही दिवसांपूर्वीच खरेदी केली असल्याची माहिती आहे. शिल्पा शेट्टी तिचा नवरा राज कुंद्रा सोबत विमानतळावर 'मर्सिडीज-बेंझ जीएलएस६०० मेबॅच लक्झरी एसयूव्ही' कारमधून बाहेर पडताना दिसली. तिच्या या आकर्षक व्हाइट एसयुव्हीची चमक शिल्पाच्या चेहऱ्यावर देखील स्पष्ट दिसत होती. या आकर्षक व्हाइट एसयूव्हीची किंमत चक्क 3.5 कोटी रुपये आहे. 'मर्सिडीज़-बैंज GLS600 मेबैक लग्जरी SUV' ही कार भारतातील सगळ्यात महागडी व लग्झरी कार आहे.

शिल्पाकडे असलेल्या गाड्यांची यादी

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा कडे अनेक महागड्या कार आहेत. त्यांच्या कार कलेक्शन मध्ये एकापेक्षा एक महागड्या SUV आहेत. याआधी शिल्पा रेंज रोव्हर एसयूव्हीमधून प्रवास करीत असे. शिल्पा शेट्टीकडे रेंज रोव्हर वॉग, बीएमडब्ल्यू आय ८, बीएमडब्ल्यू ७ सीरीज, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बीएमडब्ल्यू एक्स ५, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व लँम्बोर्गिनी एवंटाडोर सारख्या महागड्या आणि लग्जरीयस गाड्या आहेत.

मर्सिडीज़-बैंज  SUV ची वैशिष्टये

शिल्पाची ही नवी 'मर्सिडीज़-बैंज GLS600 मेबैक लग्जरी SUV' कार पांढऱ्या रंगाची असुन प्रचंड आकर्षेक आहे. यामध्ये एक इंजिन ऑप्शन ४.० लीटर, ट्विन टर्बो व्ही ८ इंजिन, ४८ वॉल्टचे माइल्ड हायब्रिड सिस्टम दिले आहे. जे ५५० बीएचपीचे व ७३० न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करते. तसेच ९ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले आहेत. त्याचप्रमाणे एमबक्स रिअर इंटरटेनमेंट, 27 स्पीकर साउंड सिस्टम, मिनी रेफ्रीजरेटर, फोल्ड आऊट केल्या जाऊ शकणारी टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक पॅनारमिक स्लायडिंग सनरूफ, एलईडी ऑप्टिकल फाइबर एम्बिंट लाइटिंग, इत्यादी अनेक आधुनिक आणि अद्यावत सुविधा दिलेल्या आहेत.