Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Women Investor in India : तीन वर्षात 27 लाखांपेक्षा जास्त महिलांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक

Women Invester in India

भारतामध्ये महिला गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांमधील महिलाही SIP मध्ये गुंतवणूक करत आहेत. मागील तीन वर्षात 27 लाख 50 हजार महिलांनी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली. नोकरी व्यवसायासाठी महिला बाहेर पडत असल्याचे या आकडेवारीतून दिसते. हा टक्का दिवसेंदिवस वाढत असून महिला आर्थिक स्वावलंबी होत असल्याचे दिसून येत आहे.

पारंपरिक गुंतवणूक योजनांशिवाय शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील महिलांचा टक्का वाढत आहे. (Women Empowerment) मागील तीन वर्षात 27 लाख 50 हजार महिलांनी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली. नोकरी व्यवसायासाठी महिला बाहेर पडत असल्याचे यातून दिसून येते. डिसेंबर 22 पर्यंतच्या एकूण आकडेवारीचा विचार करता भारतातील 74.49 लाख महिलांनी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडने (AMFI) ने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.

डिसेंबर 2019 पर्यंत महिला गुंतवणूकदारांची संख्या फक्त 46.99 लाख एवढी होती. त्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनानंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. युनिक गुंतवणूकदारांची संख्या 3 कोटी 77 लाख एवढी झाली आहे. भांडवली बाजार स्थिर असतानाही मागील एक वर्षात जवळपास 40 लाख नवगुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, असे AMFI चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस व्यंकटेश यांनी सांगितले.

कोणत्या वयोगटातील महिला गुंतवणूकदार आहेत?

एकूण महिला गुंतवणूकदारांपैकी 35% महिला या 45 वयापुढील आहेत. (Womens investment in Mutual fund) तर 18 ते 24 वयोगटातील महिलांची संख्या मागील 10 आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 45 वयोगटापुढील महिला गुंतवणूकदारांची संख्या 28.45 लाख आहे. तर 18 ते 24 वयोगटातील महिलांची संख्या 2.82 लाख आहे. डिसेंबर 2019 पासून 18 ते 24 वयोगटातील महिलांची संख्या चौपट वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामानाने 45 वयोगटातील महिला गुंतवणूकदारांची संख्या वाढली नाही.

कोरोनाकाळापासून भारतातील छोट्या शहरांमधील महिलाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास पुढे येऊ लागल्याचे दिसते. देशातील प्रमुख तीस शहरांमधील महिला गुंतवणूकदारांची संख्या डिसेंबर 2019 मध्ये 27.95 लाख होती. त्यात वाढ होऊन डिसेंबर 2022 मध्ये 41.67 एवढी झाली.

एसआयपीची संख्या किती? (Total SIP accounts)

AMFI च्या आकडेवारीनुसार, मार्च 2023 पर्यंत देशात 6.36 अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड खाती आहेत. यातील 2.29 कोटी म्हणजेच 38% खाती मागील एक वर्षांपेक्षा कमी कालावधीत अॅक्टिव्ह आहेत. 1.53 कोटी खाती 1 किंवा 2 वर्षांपासून अॅक्टिव्ह आहेत.